Crime News esakal
महाराष्ट्र बातम्या

तीन तुरुंग अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, कैद्यालाच मागितली एक लाखाची खंडणी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या गुन्हेगाराला तुरूंगात सुरक्षित ठेवण्याचे, त्याच्या प्रकृतीची काळजी घेण्याची जबाबदारी तुरूंगाधिकाऱ्याची असते. एका अर्थाने तो पालक असतो. परंतु, कुंपणच शेत खाते’ या म्हणीप्रमाणे जेलरच जर कैद्याला ‘जिवंत राहायचे असेल तर एक लाख रुपये दे’ अशी धमकी देत असेल तर काय म्हणावे? पण अशी घटना नागपूर येथील मध्यवर्ती तुरूंगात उघडकीस आली आहे. कैद्याला १ लाख ८ हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकणी तीन तुरुंगाधिकाऱ्यांविरोधात न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कृष्णा चौधरी (वय ४३), गुलाब खरडे (वय ५५) आणि रवींद्र पारेकर (वय ४५) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तुरुंगाधिकाऱ्यांची नावे आहेत. चौधरी हे सध्या नाशिक कारागृहात तर खरडे अमरावती व पारेकर हे पुण्यातील कारागृह प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आहेत. मदनकुमार बाबूलाल श्रीवास (वय ६२ रा. हिंगणघाट) याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. खुनाच्या गुन्ह्यात मदनकुमार न्यायालयीन कोठडी झाली होती. तो जामिनासाठी धडपड करीत होता. २०१४ मध्ये त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बडी गोलमधील एका बराकीत ठेवण्यात आले होते. सप्टेंबर २०१४ ते एप्रिल २०१५ या कालावधीत आरोपी तुरुंगाधिकाऱ्यांनी त्याच्याकडे एक लाख आठ हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान मदनकुमारची जामिनावर सुटका झाली. त्याने तुरुंगाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तिघांविरुद्ध विभागीय चौकशी करण्यात येऊन त्यांना निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

यापूर्वीही अडकले होते ७ तुरुंगाधिकारी -

काही दिवसांपूर्वीच पाच तुरुंगाधिकारी व दोन रक्षकांनी एका कैद्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला होता. त्याबाबतची तक्रार न्यायालयात केली. न्यायालयाच्या आदेशानंतर धंतोली पोलिसांनी पाच तुरुंगाधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. त्यांच्यासोबत दोन कैदीही आरोपी आहेत. गेल्या दोन महिन्यातील तुरुंगाधिकाऱ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला हा दुसरा गुन्हा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Work Visa Rules: सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! वर्क व्हिसा नियम बदलले; भारतीय कामगारांवर काय परिणाम होणार?

Vaibhav Sooryavanshi ला 'राड्या'नंतर बीसीसीआयने एकटे पाडले; सचिव देवजित सैकिया म्हणाले, आम्ही या प्रकरणात...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर!

Shubman Gill:'गिलला टी-२० संघातून का डच्चू दिला?' मोहम्मद अझरुद्दीनचा BCCI ला थेट सवाल

Pune Bangalore Highway : 92 पिलर अन् 3.47 किमी लांबी! पुणे-बंगळूर महामार्गावरील सर्वात मोठा पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार? लोकार्पण लांबणीवर, वाचा नवीन अपडेट

SCROLL FOR NEXT