FIR On Sambhajiraje Esakal
महाराष्ट्र बातम्या

FIR On Sambhaji Raje: "विशाळगडावर दहशतवादी राहून गेलाय," गुन्हा दाखल झाल्यानंतर संभाजीराजेंचा खळबळजनक आरोप

Vishalgad Encroachment: संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवावे यासाठी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर काल विशाळगड परिसरात मोठी दगडफेक झाली.

आशुतोष मसगौंडे

संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवावे यासाठी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर काल विशाळगड परिसरात मोठी दगडफेक झाली. यानंतर आता शाहुवाडी पोलिसांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह 500 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

यानंतर आज संभीजीराजे यांनी त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यावर भूमिका स्पष्ट केली. यासह त्यांनी खळबळजनक दावा करत दहशतवादी यासिन भटकळ तब्बल 6 दिवस विशाळगडावर राहून गेला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजे म्हणाले,"गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हटावे ही माझी पहिल्यापासून भूमिका आहे. हा विषय मी जरा उशीरा हाती घेतला आहे. विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रम झाले आहे. इथे उघड्यावर कोंबड्या कापल्या जात आहेत. इथले स्थानिक आमदार हे या सरकारसोबत आहेत त्यांनी या अतिक्रमणला खातपानी घातले आहे. एकही नेता गडकोट विषयी बोलत नाही. सर्वजण मलाच त्रास देत आहेत."

पुढे बोलताना संभीजीराजे यांनी यांनी एक खळबळजन आरोप केला आहे. ते म्हणाले की, "यासिन भटकळ हा कुख्यात दहशतवादी विशाळगडावर सहा दिवस राहून गेला आहे."

दरम्यान आता संभाजीराजे यांच्या या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

यावेळी संभाजीराजे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, "पालकमंत्र्यांना माहिती होते ही परिस्थिती संवेदनशील आहे तर त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता. त्यांनी का पुढाकार घेतला नाही? इकडून तिकडून पैसे घेऊन गडबड केली आणि आता महायुतीत गेले. त्यांनी आम्हाला फुले शाहू आंबेडकर आणि शिवरायांचे विचार शिकवू नये."

कोण आहे यासिन भटकळ?

इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य यासीन भटकळ याचा जन्म १९८३ मध्ये कर्नाटकातील भटकळ या गावात झाला. यासिनला मोहम्मद अहमद सिद्धिबाप्पा या नावानेही ओळखले जाते.

12 राज्यांच्या दहशतवादविरोधी एजन्सीच्या आरोपपत्रानुसार भटकळचा जर्मन बेकरीसह देशभरात किमान 10 दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग आहे.

दिल्लीच्या बाजारपेठेतील साखळी बॉम्बस्फोटांचाही तो मास्टरमाईंड होता. मुंबई लोकल, बेंगळुरू, जयपूर, वाराणसी, सुरत येथे झालेल्या बॉम्बस्फोटातीलही तो आरोपी आहे.

दरम्यान काल अतिक्रमण हटवण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे हे विशाळगडावर जात असतानाच विशाळगडावर अज्ञातांनी गदडफेक केली. यात काही स्थानिक जखमी झाल्याची माहिती आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाहुवाडी पोलिसांनी आता दगडफेक करणाऱ्या 500 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. शाहुवाडी पोलिसांनी यावेळी संभाजीराजे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT