Eknath Shinde Devendra Fadanvis
Eknath Shinde Devendra Fadanvis Sakal
महाराष्ट्र

शपथविधी होताच शिंदे-फडणवीस लागले कामाला; पहिली कॅबिनेट संपन्न

निनाद कुलकर्णी

मुंबई : राज्याच्या मुख्यमंदी पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही अवघ्या काही तासात कामाला लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील खरीप हंगाम, पाऊस -पाणी आणि पीकविमा याबाबत आढावा घेण्यात आला आहे. ( Shinde Government First Cabinet Meeting News In Marathi )

यावेळी शिंदे म्हणाले की, पार पडलेल्या या बैठकीत राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांना वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचा सर्वांगीण विकास हेच या सरकारचं मुख्य उदिष्ट असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. माजी मुख्यमंत्री सोबत असल्याने जोरदार बॅटिंग होईल असे शिंदे म्हणाले. जलयुक्त प्रकल्प आणि मेट्रोची कामे मार्गी लावणार असून जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू असेही शिंदेंनी यावेळी सांगितले. फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनायचं नव्हतं मात्र, आदेश आला आणि ते उपमुख्यमंत्री झाले. हे सरकार जनतेला अपेक्षित असलेली कामं करणार असल्याची ग्वाहीदेखील शिंदे यांनी यावेळी दिली. तसेच भाजपनं दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचेही शिंदे यांना यावेळी स्पष्ट केले.

शनिवारी होणार बहुमत चाचणी

दरम्यान, राज्यात आज नव्याने स्थापन झालेल्या नव्या शिंदे सरकारची येत्या शनिवारी बहुमत चाचणी होणार आहे. तर, 2 आणि 3 जुलै रोजी विधानसेभेचं विशेष अधिवेशनाचं आयोजन करण्यात आले आहेय यावेळी विधानसभा अध्यक्षांचीदेखील निवड केली जाणार आहे.

शिंदे गोव्यात जाणार

राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आज रात्री पुन्हा गोव्याकडे रवाना होणार असून, गोव्यात मुक्कामी असणाऱ्या इतर सर्व आमदारांना घेऊन ते उद्या मुंबईत दाखल होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT