Investment 
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्राला गुंतवणूकदारांची प्रथम पसंती - सुभाष देसाई

सकाळ न्यूज नेटवर्क

राज्यात ३ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक
मुंबई - मागील पाच वर्षांत राज्यात तीन लाख ५१ हजार ३७८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, देशातील एकूण गुंतवणुकीपैकी राज्याचा वाटा ३० टक्के आहे. महाराष्ट्र हे देशविदेशातील गुंतवणूकदारांच्या प्रथम पसंतीचे राज्य असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

देशातील उत्पन्नात राज्याचा १४.९३ टक्के वाटा आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेची मागील पाच वर्षांत सरासरी वाढ नऊ टक्के होती. देशातील औद्योगिक उत्पादन व नक्त मूल्यवृद्धीमध्ये राज्याचा २० टक्के वाटा आहे.

सेवा क्षेत्राचा स्थूल उत्पन्नातील वाटा ५५ टक्के आहे. केंद्र सरकारच्या उद्योगसंवर्धन व आंतरिक व्यापार विभागाच्या अहवालानुसार २०१४ ते  मार्च २०१९ अखेरपर्यंत एक हजार ७९४ एवढ्या औद्योगिक उपक्रमांनी केंद्र सरकारकडे औद्योगिक उद्योजकांचे ज्ञापन सादर केलेले असून, याद्वारे दोन लाख ४६ हजार ९१५ कोटी गुंतवणूक झालेली असून, त्यामधून ५.४० लाख रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे.

राज्यात विशाल प्रकल्प धोरण जाहीर झाल्यापासून ६४३ विशाल प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. याद्वारे ४.७९ लाख कोटी गुंतवणूक व ५.२२ लाख रोजगारनिर्मिती अपेक्षित आहेच.
- डॉ. हर्षदीप कांबळे, सचिव, माहिती उद्योग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT