On the first day fifty thousand workers received financial support 
महाराष्ट्र बातम्या

#Lockdown2.0 : रोजगार बुडालेल्यांना दिलासा; पहिल्याच दिवशी 50 हजार मजुरांना मिळाली आर्थिक मदत

सनील गाडेकर @sanilgadekar

पुणे : लॉकडाऊनमुळे रोजगार बुडालेल्या इमारत व इतर बांधकाम मजुरांना दोन हजार रुपये देण्याच्या निर्णयाचा पहिल्याच दिवशी 50 हजार मजुरांना फायदा झाला आहे. सोमवारपासून (ता.20) आर्थिक मदतीचे वाटप सुरू झाले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मदतीचे वाटप करताना जिल्हा पातळीवर गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी मंडळाच्या मुंबई येथील मुख्यालयातून राज्यभरातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना थेट ऑनलाईन पद्धतीने या मदतीचे वाटप करण्यात येत आहे. जिल्हास्तरावरून त्या बाबतची सर्व माहिती मागवून घेण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. सी. श्रीरंगम यांनी दिली.

पुण्यातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

लॉकडाऊनमुळे अन्य उद्योगांप्रमाणेच बांधकाम व्यवसायही ठप्प झाला आहे. याचा फटका राज्यभरातील मजुर वर्गाला बसला आहे. या मजुरांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये मदत जमा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला होता. राज्यातील 12 लाख 18 हजार मजुरांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

Coronavirus : पुणे : शववाहिकाच्या चालकांसाठी महापालिकेचे 30 पीपीपी किट

बांधकाम व्यावसायिकांकडून सेझच्या रूपात जमा झालेले नऊ हजार कोटी रुपये मंडळाकडे जमा आहेत. त्यातील 240 कोटी रुपये कामगारांना मदत म्हणून देण्यात येणार आहेत. दररोज किमान 80 हजार मजुरांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल, अशी यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे नोंदणी असलेल्या सर्व मजूरांना येत्या पंधरा दिवसांत आर्थिक मदत मिळणार आहे.

Coronavirus : नायडू, ससूनला 10 स्वॅब टेस्टींग बूथ प्रदान

अर्ज किंवा कागदपत्रांची गरज नाही : 

रक्कम मिळण्यासाठी मजुरांकडून कोणत्याही प्रकारचा अर्ज भरून घेण्यात येत नाही. तसेच त्यांना कोणतेहे कागदपत्र देखील देण्याची गरज नाही. त्यामुळे कोणी मध्यस्थ, संस्था किंवा संघटना कामगारांकडून कागदपत्रे मागत असतील तर ते त्यांना देऊ नये. फसवणूक करणाऱ्यापासून दूर रहावे, असे आवाहन श्रीरंगम यांनी केले. कामगारांना भुलथापा देत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


- 12 लाख 18 हजार नोंदणीकृत सक्रिय मजूर
- प्रत्येकी दोन हजार रुपये मदत मिळणार
- मंडळाकडे नऊ हजार कोटी रुपये जमा
- 240 कोटींचे होणार वाटप
- दररोज किमान 80 हजार कामगारांना मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan-Sambhajinagar Highway Crash: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; अर्धवट रस्त्याच्या कामामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यातील आंदोलन स्थगित! 'वर्षा' बंगल्यावर आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा

Rahul Gandhi: ''काँग्रेसचा इतिहासच दलितविरोधी'', राहुल गांधींच्या आरोपांनंतर भाजपचा जोरदार पलटवार

ISRO GSLV F-17 launch: आठ महिन्यांनंतर इस्रोची उड्डाणशृंखला पुन्हा सुरू; जीएसएलव्ही एफ-१७ वरून भूस्थिर कक्षेत ईओएस-०५ दूरसंवेदन उपग्रहाचे ४ सप्टेंबरला प्रक्षेपण

Nepal Flood Miracle Rescue: नेपाळच्या महापुरातून ९७ वर्षीय गुणा माया बोहरांची चमत्कारिक सुटका; ढिगाऱ्यांतून फुललेली जगण्याची उमेद

SCROLL FOR NEXT