Sonpeth Village esakal
महाराष्ट्र बातम्या

Sonpeth Village : परभणीत मोठी दुर्घटना; शौचालयाच्या हौदात बुडून पाच मजुरांचा गुदमरून मृत्यू

एका शेतातील आखाड्यावर शौचालयाच्या हौदाची स्वच्छता करण्यासाठी गेलेले सहा मजूर हौदात बुडाले.

सकाळ डिजिटल टीम

सोनपेठ : दहिखेड शेत शिवारात असणाऱ्या एका शेतातील आखाड्यावर शौचालयाच्या हौदाची स्वच्छता करण्यासाठी गेलेले सहा मजूर हौदात बुडाले. त्यापैकी पाच जणांचा बुडून जागीच मृत्यू झाला तर, एक जण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

सोनपेठ तालुक्यातील भाऊचातांडा शिवारात असलेल्या एका शेतात सेफ्टी टँकचं सफाईचं काम करत असताना पाच जणांचा टँकमध्ये बुडून गुदमरून मृत्य झाला. तर, एकजण गंभीर जखमी झाल्याचं समजतं. ही घटना काल रात्री दहाच्या सुमारास घडली. काल सहाजण दुपारी तीनपासून ह्या शौचालयाच्या सेफ्टी टँकची स्वच्छता करत होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली.

मयत झालेले मजूर

  • 1) शेख सादेक (वय 45)

  • 2) शेख सादेकचा मुलगा शेख शाहरुख (वय 19)

  • 3) शेख सादेकचा जावई शेख जुनेद (वय 29)

  • 4) शेख नवीद (वय 25)

  • 5) शेख नवीदचा चुलत भाऊ शेख फिरोज (वय 19)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: रविवारी सुट्टीची गरज का आहे? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी तरुण वकिलांना काय दिला सल्ला?

Devendra Fadnavis:‘बारामती’ बिनविरोध होण्यास‘प्रसिद्धी’मुळे खोडा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रमुख पक्षांच्या प्रयत्नांनाही धक्का!

Kolkata Knight Riders: अजिंक्य रहाणेला दिलासा! १८ कोटींचा स्टार अखेर मैदानात; KKR चं टेंशनचं मिटल

Shevgaon Murder: तरुणाचा दगडाने ठेचून खून; शेवगावमधील घटना, ओढ्याजवळ अढळला मृतदेह, तीन संशयित ताब्यात, काय घडलं!

Mumbai Local Train : थरकाप उडवणारी घटना! विक्रोळी स्थानकावर लोकलचा थांबा चुकला, काही क्षणातच मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT