solapur cp office sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर शहरातील ‘या’ ५ पोलिस ठाण्यास मिळणार नवे प्रभारी! तिघांना पदोन्नती, दोघांचा कार्यकाळ पूर्ण; ‘या’ अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा, कोणाला मिळणार संधी

सोलापूर शहरातील जेलरोड, सदर बझार आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. त्यामुळे आता त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्यांना संधी मिळणार आहे. दुसरीकडे, विजापूर नाका व सलगर वस्ती पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ तीन महिन्यांपूर्वीच संपला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातील जेलरोड, सदर बझार आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. त्यामुळे आता त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्यांना संधी मिळणार आहे. दुसरीकडे, विजापूर नाका व सलगर वस्ती पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ तीन महिन्यांपूर्वीच संपला आहे. या पाच पोलिस ठाण्यांपैकी कोठेतरी आपल्याला प्रभारी म्हणून काम करण्याची संधी मिळावी, यासाठी अनेकजण प्रयत्न करीत आहेत.

सोलापूर शहरात सात पोलिस ठाणी असून जोडभावी पेठ व फौजदार चावडी पोलिस ठाण्यांच्या प्रभारींचा कार्यकाळ अजून पूर्ण झालेला नाही. तरीही, या ठिकाणी खांदेपालट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, एमआयडीसीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे, जेलरोडचे शिवाजी राऊत आणि सदर बझारचे नामदेव बंडगर यांची पदोन्नती झाली आहे. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी नवे प्रभारी कोण येणार, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

त्यासंदर्भात पोलिस आयुक्त एम. राज कुमार हे अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून निर्णय घेतील. तूर्तास, एका महिला अधिकाऱ्याकडे कोणत्यातरी पोलिस ठाण्याचा पदभार सोपविला जाण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी अश्विनी भोसले यांना पहिल्यांदा तशी संधी दिली होती. त्यानंतर कोणत्याही महिला पोलिस अधिकाऱ्यास पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून काम करण्याची संधी मिळालेली नाही.

‘या’ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची चर्चा

मानव संसाधन विभागाकडील उदयसिंह पाटील, एमआयडीसी पोलिस ठाण्यातील विजय खोमणे, नियंत्रण कक्षातील विकास देशमुख व सुहास चव्हाण, तसेच जेलरोड पोलिस ठाण्यातील भाऊराव बिराजदार या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांपैकी दोघे पोलिस ठाण्याचे प्रभारी होतील. दुसरीकडे, विजापूर नाका पोलिस ठाण्याचे दादासाहेब गायकवाड व सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे उमाकांत शिंदे यांच्याकडे पुन्हा दुसऱ्या पोलिस ठाण्याची जबाबदारी येऊ शकते, असेही बोलले जात आहे. तर सुरक्षा शाखेकडील पोलिस निरीक्षक संगीता पाटील, विशेष शाखेकडील वैष्णवी पाटील, भरोसा सेलकडील स्नेहल म्हेतर व नियंत्रण कक्षाकडील शबनम शेख यांच्यापैकी एकीस संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT