schools sakal
महाराष्ट्र बातम्या

Solapur News: पाच ते सहा हजार शिक्षक होणार अतिरिक्त! संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचे आधार बंधनकारक

एप्रिल-मे महिन्यात ३० हजार शिक्षक भरले जाणार आहेत. तत्पूर्वी, संचमान्यता होणार असून त्यासाठी आधार क्रमांक असलेले विशेषतः: ज्या विद्यार्थ्यांचे आधार व्हेरिफाय झाले, तीच पटसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे.

तात्या लांडगे

Solapur News : एप्रिल-मे महिन्यात ३० हजार शिक्षक भरले जाणार आहेत. तत्पूर्वी, संचमान्यता होणार असून त्यासाठी आधार क्रमांक असलेले विशेषतः: ज्या विद्यार्थ्यांचे आधार व्हेरिफाय झाले, तीच पटसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे.

मात्र, जिल्ह्यातील अंदाजे साडेबारा हजार विद्यार्थ्यांकडे आधारकार्डच नसल्याने तब्बल अडीचशे ते ३०० शिक्षक तर राज्यातील अंदाजे तीन लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नसल्याने जवळपास पाच ते सहा हजार शिक्षक अतिरिक्त होतील, अशी स्थिती आहे. त्यामुळे वेळेत त्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढूनच घ्यावे लागणार आहे.

‘आरटीई’नुसार प्रत्येकी ३० विद्यार्थ्यामागे एक शिक्षक, असे समीकरण घालून देण्यात आले आहे. मात्र, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची पटसंख्या कमी झाली असून १४ हजार शाळांचा पट २० पेक्षा देखील कमी आहे.

काही शाळांमध्ये एका तुकडीत ४८ विद्यार्थी असल्याने त्यांनी तुकडी मान्यतेचा प्रस्ताव दिले आहेत. १८ विद्यार्थी जास्त असल्याने संबंधित शाळांनी त्याठिकाणी ज्यादा शिक्षकांची मागणी केली आहे.

काही शाळांनी गावातील खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी आपल्याकडे दाखवून शिक्षक मान्यता घेतल्याचीही अनेक उदाहरणे यापूर्वी समोर आली.

या सर्व बाबींना लगाम बसावा म्हणून संचमान्यतेसाठी आता संबंधित विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक ‘सरल’ पोर्टलवर नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे एकाच विद्यार्थ्याला दोन ठिकाणी दाखवता येत नाही. २०२२-२३ ची संचमान्यता आता सुरु झाली आहे.

जिल्ह्यातील शाळांची स्थिती

  • झेडपीच्या शाळा

  • २७९५

  • विद्यार्थी संख्या

  • २.१९ लाख

  • माध्यमिक शाळा

  • १०६३

  • अंदाजे एकूण विद्यार्थी

  • १.६३ लाख

  • आधार नसलेले विद्यार्थी

  • १२,५००

वेळेत आधार कार्ड काढून घ्यावेत

जिल्हा परिषद व माध्यमिक शाळातील काही विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नाही. तर ५० ते ६० हजार विद्यार्थ्यांचे नाव, लिंग, जन्मतारीख नोंदणीत त्रुटी असून त्यात दुरुस्ती मुख्याध्यापकांकडून सुरु आहे. आधारकार्ड नसलेले विद्यार्थी पटसंख्येत ग्राह्य धरले जाणार नसून शाळांनी तत्काळ त्यांचे आधारकार्ड काढून घ्यावे. अन्यथा, तेवढे शिक्षक अतिरिक्त होऊ शकतात.

- संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

‘अतिरिक्त’च्या निर्णयापूर्वी एक संधी

‘एनआयसी’ने संचमान्यतेचा डेटा नुकताच फ्रिज केला असून आता जिल्हानिहाय ठराविक तारखेला संचमान्यतेचे कॅम्प घेतले जाणार आहेत. ही संचमान्यता विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकावर आधारित असणार आहे.

त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. पण, अतिरिक्तचा निर्णय घेण्यापूर्वी संबंधित विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक ‘सरल’वर अपलोड करण्यासाठी शाळांना ठराविक दिवसांची संधी दिली जाणार आहे. त्या मुदतीनंतर अंतिम निर्णय होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Israel Iran War : इराणकडून सुरक्षा प्रमुखाच्या मृत्यूची कबुली, अमेरिकेचा होर्मुझजवळील क्षेपणास्त्र तळावर सर्वात शक्तिशाली बॉम्बने हल्ला

Palghar Bribery case: पालघरमध्ये आरोग्य अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, 35 हजार स्विकारत हाेते अन् काय घडलं!

Dharshiv Hailstorm News: लातूर-धाराशिवमध्ये गारपीटीचा कहर; शेती पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान; अवकाळी पावसाचा तडाखा!

Malkapur Accident: कंटेनरखाली चिरडल्याने दुचाकीस्वार ठार; मलकापूरजवळ अपघात, कंटेनरच्या वेगानं हाेत्याचं नव्हतं झालं!

शिक्षकांची नाही यंदा उन्हाळ्याची सुट्टी! एप्रिलअखेर जनगणनेचे प्रशिक्षण अन्‌ १६ मे ते १४ जूनपर्यंत करावी लागणार घरगणना, विशेष रजा मिळणार, वाचा...

SCROLL FOR NEXT