सोलापूर : महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे (maharashtra rain) आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चाचणी संस्थेने (national testing agency) कोल्हापूर, पालघर, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा या शहरांमधील विद्यार्थ्यांना जेईई मुख्य परीक्षेसाठी (JEE mains exam) दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. पुराच्या स्थिती निवळल्यानंतर ऑगस्टमध्ये ही परीक्षा होण्याची शक्यता आहे. (flood affected student will get double chance for jee mains exam)
मागील काही दिवसांपासून राज्यातील कोकण विभाग व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे बाधित जिल्ह्यांमध्ये 'जेईई'ची मुख्य परीक्षा घेणे कठीण झाले आहे. ही परीक्षा चार टप्प्यात होत असून 20, 22, 25 आणि 27 जुलैला देशातील 334 शहरांमध्ये जेईइची परीक्षा घेतली जात आहे. त्यापैकी सध्या तीन पेपर पूर्ण झाले असून मंगळवारी (ता. 27) शेवटचा पेपर होणार आहे. तत्पूर्वी, शनिवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पूरग्रस्त जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पुरामुळे परीक्षा केंद्रांवर जाता न आलेल्या अथवा परीक्षेची संधी हुकलेल्यांनी कोणतीही चिंता करू नये, असेही संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, पुरामुळे अनेकांचा संसार पाण्यात वाहून गेला असून अनेकजण उघड्यावर राहत आहेत. वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून त्याठिकाणी मदतकार्य सुरू आहे. अशा परिस्थितीत परीक्षेची संधी हुकली म्हणून कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहनही नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वरिष्ठ संचालिका डॉ. साधना पराशर यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील पूरग्रस्त जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा संधी दिली जाईल. जेईई मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी www.nta.ac.in आणि jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावरून पुढील सूचना जाणून घ्याव्यात. तसेच 011-40759000 अथवा jeemain@nta.ac.in यावर मेल अथवा कॉल करून अधिक माहिती त्यांना घेता येईल.- डॉ. साधना पराशर, वरिष्ठ संचालक, परीक्षा
तंत्रशिक्षण संचालनालयाचीही मुदतवाढ -
तंत्रशिक्षण संचालनालयाने दहावीच्या निकालानंतर अर्ज करण्यासह गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्याच्या कार्यक्रमात बदल केला आहे. नव्या बदलानुसार अर्ज करून त्याची पडताळणी करण्याची मुदत 30 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणीही त्याच दिवशी होणार आहे. पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी 2 ऑगस्ट रोजी जाहीर होईल. त्यातील विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा निपटारा करून 7 ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल, अशी माहिती संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली. http://poly21.dtemaharashtra.gov.in या ठिकाणी विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादी पाहता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.