Flood situation in Mumbai-Pune  
महाराष्ट्र बातम्या

मुंबई-पुण्यात पूरस्थिती, मराठवाडा कोरडाच!

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यात पुणे, मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये धुवाधार पाऊस बरसल्याने या भागातील धरणे काठोकाठ भरली आहेत. या पाचही जिल्ह्यांत यंदाच्या पावसाळ्यातील सरासरी केव्हाच ओलांडली आहे. मात्र, दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्याचे डोळे अजूनही पावसाकडे लागले आहेत. महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांत २७ टक्के पाऊस पडला. १ जून ते ४ ऑगस्ट यादरम्यान महाराष्ट्रात ५९२.२ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. त्या तुलनेत यंदा यादरम्यान ७५४.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस
देशात महाराष्ट्र आणि सिक्कीम (२८ टक्के) या दोनच राज्यांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले. देशात सर्वाधिक पाऊस मध्य महाराष्ट्रात या हवामान उपविभागात पडला आहे. येथे पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांत ४३६.४ मिलिमीटर पाऊस पडतो. या वर्षी सरासरीपेक्षा ५८ टक्के जास्त म्हणजे ६९०.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

    सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडलेले जिल्हे - ५
    पावसाची सरासरी ओलांडलेले जिल्हे - ८
    सरासरी गाठलेले जिल्हे - १५
    सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेले जिल्हे - ८
    मध्य महाराष्ट्रात पडलेल्या पावसाची टक्केवारी - ५८ 
    कोकणातील पावसाची टक्केवारी - ४५
    मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत १८,
तर विदर्भात ५ टक्के कमी पाऊस
    राज्यात सर्वाधिक पाऊस पुण्यात.
(सरासरीच्या तुलनेत ११८ टक्के)
    सर्वांत कमी पावसाची नोंद बीड येथे.
(सरासरीच्या तुलनेत ३९ टक्के कमी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: इराणचे सर्वोच्च नेते एवढे शांत का आहेत? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना उत्तर का देत नाहीत? नेमकी रणनीती कोणती?

Layoffs: हजारो कर्मचाऱ्यांवर गंडांतर; पण 'ही' कंपनी ९ महिन्यांचा पगार देणार, नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांना भरघोस सेवरन्स पॅकेज

Viral Video: अरे, रूको यार... आप सिलेक्टर हो, मानता हू…! R Ashwin ने केली संजू सॅमसनच्या 'मन की बात'; नक्कल पाहून आगरकर, गौतम गंभीरचा झाला असेल जळफळाट

'मी त्याला डिक्कीत कोंबलं आणि...' अभिजीत खांडकेकरला अभिनेत्रीनं सर्वांपासून लपवून आणलं घरी, परंतु कारण काय?

Marathi News Live Updates: ट्रक आणि कारचा भीषण अपघात, दोघे जखमी

SCROLL FOR NEXT