महाराष्ट्र

लोककला पथके अनुदानापासून दूर!

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राज्यातील लोककलांचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने २००८ ला लोककला पथकांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. लोककला पथकांची पात्रता निश्‍चित करून अर्जांची छाननी करण्यासाठी सरकारने समितीही स्थापन केली. मात्र २०१७ नंतर अनुदानाबाबत एकही बैठक झालेली नाही, त्यामुळे लोककलेबाबत सरकारची उदासीनताच दिसून येत आहे.

२०१७ मध्ये तत्कालीन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अनुदान वाटपाबद्दल बैठक झाली. त्यानंतर आतापर्यंत लोककलांच्या पथकांच्या अनुदान वाटपाबाबत एकही बैठक झालेली नाही, अशी माहिती लोककला पथक अनुदान छाननी समितीचे सदस्य रघुवीर खेडकर यांनी दिली. त्यामुळे सुमारे ४० लोककला पथकांची प्रकरणे अनुदानाच्या मंजुरीसाठी प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. २०१६ मध्ये ३० कला पथकांच्या प्रयोग अनुदानाच्या मंजुरीची फाइलही सांस्कृतिक विभागाकडे पडून आहे. त्यावर सांस्कृतिक विभाग काहीच निर्णय घेत नसल्यामुळे या उदासीनतेवर समितीचे सदस्य नाराज आहेत.

लोककला पथकांचे ६० अर्ज अनुदानासाठी आले होते. त्यातील पहिल्या टप्प्याचे अनुदानवाटप करण्यात आले. त्यानंतर किती कलाकारांना अनुदानासाठी पात्र केले, किती अनुदानाचे वाटप झाले, किती अर्ज आले, याबाबत आम्हाला सांस्कृतिक खात्याकडून काहीच माहिती मिळालेली नाही. 
- रेश्‍मा परितेकर, सदस्य, लोककला पथक अनुदान छाननी समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT