पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी Sakal
महाराष्ट्र बातम्या

पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा मैदानीच! मैदानी ५० तर लेखी १०० गुणांची परीक्षा

महाराष्ट्र पोलिस अधिनियमात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पोलिस भरतीसाठी आता पहिल्यांदा मैदानी चाचणीच घेतली जाणार असल्याचे २३ जून रोजी स्पष्ट करण्यात आले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्र पोलिस अधिनियमात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पोलिस भरतीसाठी आता पहिल्यांदा मैदानी चाचणीच घेतली जाणार असल्याचे २३ जून रोजी स्पष्ट करण्यात आले आहे. ५० गुणांची शारीरिक चाचणी तर १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ग्रामीण भागातील तरूणांना सुरवातीला लेखी परीक्षा घेतल्याने भरती प्रक्रियेतून बाहेर जावे लागत होते. त्यामुळे शारीरिक चाचणीत अव्वल ठरणाऱ्या उमेदवारांनाही पोलिस भरतीची संधी मिळत नव्हती. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे.

लेखी चाचणीत बहुतेक प्रश्न हे बहुपर्यायी प्रकारचे असतील. लेखी परीक्षेत उमेदवाराला किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात १० जागा रिक्त असतील तर त्यासाठी एका पदासाठी दहा जणांना (शारीरिक योग्यता चाचणीत किमान ५० टक्के गुण अपेक्षित) लेखी चाचणीसाठी बसता येईल. पण, दहा जागांसाठी १०० जण लेखी परीक्षेस पात्र झाले आणि शंभराव्या क्रमांकावरील उमेदवाराला जेवढे गुण आहेत, तेवढे गुण असलेल्या उर्वरित उमेदवारांनाही लेखी परीक्षा देता येणार आहे. आता २०२० मधील सात हजार २३१ पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी त्याची घोषणा केली होती. राज्याच्या गृह विभागात सद्यस्थितीत तब्बल ४९ हजार पदे रिक्त आहेत. आता परीक्षेची कार्यपध्दती निश्चित झाल्याने रिक्त पदांची टप्प्याटप्प्याने भरती केली जाणार आहे. महिलांना ८०० आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक अशी शारीरिक चाचणी असेल. पहिल्यांदा लेखीऐवजी आता मैदानी चाचणी होणार असल्याने ग्रामीण भागातील तरुणांमध्ये (पोलिस भरतीची तयारी करणारे) आनंदाचे वातावरण आहे. ‘सकाळ’ने यासंदर्भात सातत्याने वृत्त प्रकाशीत केले होते.

  • लेखी परीक्षेचे स्वरूप
    - १६०० मीटर धावणे : २० गुण
    - १०० मीटर धावणे : १५ गुण
    - गोळाफेक : १५ गुण

  • लेखी परीक्षेचे स्वरूप
    - शारीरिक चाचणीत ५० टक्के गुण
    - रिक्त जागांच्या एकापदासाठी १० जणांची होईल निवड
    - अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी, मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न
    - लेखी परीक्षेसाठी ९० मिनिटांचा वेळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik: लग्नानंतर सासरचं नाव लावण्यावरून वाद, जबरदस्तीने गर्भपात अन् ३ कोटींची मागणी; महिला लोकप्रतिनिधीच्या डॉक्टर पतीला अटक

Mumbai-Bengaluru Vande Bharat: मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत स्लीपर’ पुणेमार्गेच; तिकिटाचे दर राजधानीपेक्षा २० टक्क्यांनी जास्त असणार..

Wardha News: पालिकेच्या स्वच्छता विभागाची शहरात मान्सूनपूर्व मोहीम; स्वच्छता सभापतींची नियोजनबद्ध आखणी : शहरातील नाले झाले परत प्रवाहित

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला; वाढते तेलदर आणि रुपयाच्या घसरणीने बाजार हादरला

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणात आरसीसी पॅटर्नचे संचालक प्रा.शिवराज मोटेगावकर यांना सीबीयाने घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT