Nawab-Malik sakal media
महाराष्ट्र बातम्या

यासाठी 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त'; मलिकांचा भाजपवर आरोप

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: काल आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त' असं ट्विट नवाब मलिकांनी केलं आहे. त्यांनी आता पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत आरोप तसेच अनेक खुलासे केले आहेत. हा सारा खेळ महाराष्ट्राला बदनाम करुन बॉलिवूड उत्तर प्रदेशला नेण्याचा डाव आहे. समीर वानखेडे हा पोपट असून त्याचा जीव भाजप पक्षामध्ये आहे. पोपट अडकला आहे म्हणूनच भाजप तडफडत आहे. पण भाजप त्याच्या पाठीशी उभा राहिला आहे. मात्र, वानखेडेच्या माध्यमातून बॉलिवूडला यूपीमध्ये नेण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असं त्यांनी म्हटलंय.

पुढे नवाब मलिकांनी म्हटलंय की, मी काल ट्विट केलं होतं की, पिक्चर अभी बाकी आहे. कालपासून परिस्थिती बदलली आहे. जी व्यक्ती आर्यन खानला घेऊन जात होता आज ती व्यक्ती आता तुरुंगात आहे. सेशन कोर्टाने काल तिघांना जामीन दिला. त्याला पकडणारेच आता बचावाचा मार्ग शोधत आहेत. यासाठी मी काल लिहलं होतं की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! जोपर्यंत एखादा गुन्हा सिद्द होत नाही तोवर एखाद्याला तुरुंगात डांबणं अन्यायकारक आहे. एनसीबीने वेगवेगळे दावे करुन केस अधिक किचकट करायचा प्रयत्न करते, वानखेडे पदावर आल्यावर याप्रकारच्या गोष्टी वाढल्या आहेत.

हा लढा कुणाविरोधात अथवा कोणा धर्माविरोधात नाही. अन्यायाविरोधात आहे. वानखेडेंच्या कुटुंबियांनी आरोप केला की, आधी म्हणाले माझ्या कुटुंबियांना यात गोवण्यात आलंय. मी त्यांच्या आईचं नाव कधीच घेतलं नाहीये. फक्त जन्मदाखला टाकल्यावर वडिलांचं नाव घेतलं. क्रांती रेडकर यांचं नाव कधीही घेतलं नाही, असं त्यांनी म्हटलंय.

पुढे ते म्हणाले की लोकांनी मला विचारलं हा फोटो का टाकला? त्यांच्या पहिल्या पत्नीची इच्छा होती की हा फोटो टाकावा म्हणून टाकला, असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. चुकीच्या पद्धतीने अडकवलेले अनके जण आज तुरुंगात खितपत पडलेत. ज्याने स्पेशल 26 पत्र दिलं तो अज्ञात आहे. जर कुणी आपली ओळख लपवत असेल तर अशा तक्रारीची दखल घेतली जात नाही. मात्र हे प्रकरण गंभीर आहे. त्याची चौकशी व्हावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

तो दाढीवाला काशिफ खान

त्यांनी म्हटलंय की, तो दाढीवाला आहे काशिफ खान. फॅशन टीव्हीचा इंडिया हेड आहे. जगभरात तो फॅशन शो आयोजित करतो. ड्रग्ज आणि सेक्स रॅकेट चालवण्याचं काम करतो. त्या दिवशीचं आयोजनामध्ये एक आयोजन काशिफ खानकडून झालं होतं. त्याने सोशल मीडियावर आमंत्रण टाकलं होतं. त्या दिवशी क्रूझवरील व्हिडीओमध्ये तो आपल्या मैत्रीणीसोबत नाचताना दिसून आला. त्याची अटक का झाली नाही, हा सवाल मी वानखेडेंना विचारलं होतं. हा पॉर्न, सेक्स आणि ड्रग्ज रॅकेट चालवणारा व्यक्ती आहे. अनेकवेळा एनसीबीने कारवाईचे प्रयत्न केले आहेत मात्र वानखेडेंनी तेंव्हा अडवलं आहे.

बॉलिवूड यूपीला नेण्याचा कट

या पोपटाचा जीव भाजप पक्षात आहे म्हणून भाजप त्यांच्या पाठीशी उभं राहिलंय. कारण पोपट अडकला तर आपण सुद्धा गोत्यात येऊ, अशी त्यांना भीती आहे. हे सारं कारस्थान बॉलिवूडला यूपीमध्ये हलवण्यासाठीचं आहे. मात्र ते यशस्वी होऊ देणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI ECL Rule: आरबीआयच्या नवीन नियमांमुळे खासगी बँकांचे कर्ज महागणार? कोणत्या बँकांवर होणार परिणाम?

French PM Resigns: फ्रान्सची राजकीय अस्थिरता शिगेला! मंत्रिमंडळ नेमलं, पण पंतप्रधानांचा काही तासांत राजीनामा

Vijay Wadettiwar: ''काँग्रेसला मराठा समाजाने नाही तर...'', जरांगेंना उत्तर देताना वडेट्टीवारांचं मोठं विधान

Pune Traffic Police : मोशीत वाहतूक पोलिसाला मारहाण करणारे दोघे अटकेत; सिग्नल तोडल्याचे छायाचित्र काढल्याने वाद

Shocking News: हृदयद्रावक घटना ! पुराने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला; शेतकऱ्याने दुसऱ्याच दिवशी जीवन संपवले

SCROLL FOR NEXT