Raju Kendre News Updates Raju Kendre News Updates
महाराष्ट्र बातम्या

बुलडाण्याचा राजू केंद्रे फोर्ब्सच्या यादीत; शेतकऱ्याचा लेक चमकला

सकाळ डिजिटल टीम

बुलडाणा : लोणार शहरापासून हाकेच्या अंतरावर जवळपास ४०० घराचे व हजार- बाराशे लोकवस्तीच्या व शिक्षणाचा गंधही नसलेल्या पिंप्री खंदारे या गावाचा उंबरठा ओलांडला आणि त्याने मजल दर मजल संकटावर मात करीत लंडनच्या विद्यापीठात शिवेनिंग शिष्यवृत्ती प्राप्त केली. आता तर भारतातील विशेष कार्य करणाऱ्या ३० वर्षांखालील तरुण ‘गेमचेंजर्स’च्या ‘फोर्ब्स इंडिया’च्या यादीत निवड झाली. हे भाग्य लाभलेल्या तरुणाचे नाव आहे, राजू केंद्रे. २३ वर्षीय राजूने मातृतीर्थ जिल्ह्याचेच नव्हे तर, महाराष्ट्र आणि देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. (Raju Kendre News Updates)

३० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व समाजात क्रांतिकारी सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुण प्रभावशाली उद्योजक, व्यावसायिक, डिझायनर आणि खेळाडूंचा ‘फोर्ब्स इंडिया’च्या यादीत समावेश होत असतो. तो मान राजू केंद्रे याला मिळाला आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे त्याच्या संघर्षाचा इतिहास असतो. असाच काहीसा प्रवास राजू केंद्रे याचा आहे. लंडनची शिवेनिंग शिष्यवृत्ती या अत्यंत मानाच्या स्कॉलरशिपसाठीही राजूची निवड झाली. त्यासाठी १६० देशांतील ६३ हजार विद्यार्थ्यांनी आवेदन केलेले होते. देशासह समाजात बदल घडवू पाहणाऱ्‍या तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी जवळपास ४५ लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळतेय.

पदव्युत्तर शिक्षण झाल्यावर राजूला महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री फेलोशिप सुद्धा मिळालीय. समाजकार्य महाविवद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत असताना नेट सेट सारख्या परीक्षा ही पहिल्याच झटक्यात त्याने उत्तीर्ण केली व आय-पॅक सारख्या राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्‍या संस्थेसोबतही काम केले आहे. राजूने शिक्षण टाटा सामाजिक विज्ञान संस्थेसारख्या नामांकित संस्थेत ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले.

मेळघाट सारख्या दुर्गम भागात तळमळीने काम करणारा राजू केंद्रे यांनी नुकतीच नव्या वळणावरील प्रवासाला सुरुवात केलीय. ‘एकलव्य इंडिया’ नावाची संस्था सुरू केली व त्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. तसेच, तळागाळातील नेतृत्व सक्षम केले जाते. त्यांच्या संस्थेने ३०० विद्यार्थ्यांना नामवंत विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळविण्यात मदत केली आहे. केंद्रे आता इंग्लण्डमधील विद्यापीठात विकास प्रक्रियेचा अभ्यास करत आहे.

राजू आज छोट्याशा गावातून लंडनला जातोय याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शिवाय आमच्या राजू सारखे अनेक राजू तयार झाले पाहिजे.
- आत्माराम व जिजाबाई केंद्रे, राजूचे मातापिता

आदर्शवत कार्य

राजूच्या घरची परिस्थिती तशी जेमतेम. आईवडील शेतकरी व साधी माणसे. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांवर चांगले संस्कार केले. राजूचा मोठा भाऊ सिक्युरिटी संस्थेत नोकरी करीत. राजूने मागील तीन ते चार वर्षांत शेकडो युवकांना देशातील चांगल्या कॉलेज, विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी व करिअरविषयी मार्गदर्शन केले. शिक्षणाच्या पारंपरिक चौकटी ओलांडून ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये नवा दृष्टिकोन आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न तो करत असतो. प्रचंड इच्छाशक्ती आणि अथक परिश्रम करण्याची तयारी असली की कोणतीही गोष्ट आवश्यक नाही हे राजूने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Raid : अवैध स्त्रीबीज खरेदी-विक्री रॅकेटप्रकरणी बारामती, ठाणे आणि नाशिकमध्ये ईडीचे छापे; २९ लाखांची रोकड जप्त

Ration Card e-KYC: रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता घरबसल्या करता येणार ई-केवायसी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Latest Marathi News Live Update : 'हा' तर शिंदेंना गोत्यात आणण्याचा डाव; गुलाबराव पाटीलांनी केली ऑडिओ क्लिपच्या SIT चौकशीची मागणी

IND vs NZ 2nd T20: भारत न्यूझीलंडचा दुसरा टी-२० सामना कधी अन् कुठे पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या

Farmer Loan Waiver : कर्जमाफीची चौथी यादी जाहीर; पुण्यातील १६ हजार २४६ शेतकऱ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT