महाराष्ट्र बातम्या

चार वर्षांत परीक्षा नसल्यामुळे स्वयंघोषित सर्पमित्रांचा सुळसुळाट 

नेत्वा धुरी

मुंबई - मानवी वस्तीत आलेल्या सापांची सुटका करण्यासाठी वन विभागाकडून परीक्षा घेऊन सर्पमित्र निवडले जातात. परंतु, मागील चार वर्षांत अशी परीक्षा झालेली नाही. त्याचप्रमाणे 2015 मध्ये झालेल्या परीक्षेची पुढील प्रक्रियाही झालेली नाही. परिणामी, बोगस सर्पमित्रांचा सुळसुळाट झाला असून, त्यातूनच राजू सोळंकी या स्वयंघोषित सर्पमित्राचा शिवडी येथे नागाच्या दंशामुळे मृत्यू झाला, अशी चर्चा सुरू आहे. 

स्थानिक सर्पमित्रांसह जिल्हापातळीवर बैठक न घेणे, वन विभाग आणि प्राणिप्रेमी संघटनांमध्ये संवाद नसणे आदी उणिवा राजू सोळंकी प्रकरणानंतर पुन्हा समोर आल्या आहेत. ठाणे प्रादेशिक वन विभागाने ठाण्यातील कोपरी येथे 2015 मध्ये मुंबई विभागातील सर्पमित्रांसाठी घेतलेल्या परीक्षेला 50 जण उपस्थित होते. उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींना "सर्पमित्र' असे ओळखपत्र दिले जाते. मात्र, ही परीक्षा दिलेल्या एकालाही असे ओळखपत्र मिळालेले नाही. साप आढळलेल्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होते. अशा वेळी ओळखपत्र असल्यास समस्या येत नाही, असे प्राणिप्रेमी संघटनांच्या सदस्यांनी सांगितले. 

प्राणिमित्र आणि वन विभाग यांच्यातील संवाद वाढावा, यासाठी ठाणे प्रादेशिक वन विभागातील तत्कालीन मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी बैठका घेतल्या होत्या. सर्पमित्रांनी साप पकडल्यानंतर तातडीने वन विभागाला कळविणे, जिल्हानिहाय बैठक घेऊन समस्या जाणून घेणे आदी बाबींचे नियोजन झाले होते. त्यावर अद्याप अपेक्षित कार्यवाही झालेली नाही, अशी तक्रार प्राणिप्रेमी करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 'या' मुद्द्यावर सरकारने दिला स्पष्ट नकार

Success Story: श्वेता पवार खेळाडू कोट्यातून राज्यात प्रथम; पोलिस उपनिरीक्षकपदी निवड, संघर्षातून एमपीएससीमधील तिसरे यश!

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमध्ये बनावट नोटा जप्त, दोघांना अटक

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Whatsapp Guest Chats : आता अकाऊंट नसताना चालणार WhatsApp! नंबर सेव्हपासून अन् ॲप डाउनलोड करण्यापर्यंतच टेन्शन संपणार, जाणून घ्या कसं?

SCROLL FOR NEXT