Devendra Fadnavis speaks about Ajit Pawat that I will say the right thing at the right time 
महाराष्ट्र बातम्या

'महाराष्ट्रात जे सुरुय त्याला सरकार म्हणता येईल का?'

विनायक होगाडे

मुंबई: भाजपची राज्यकार्यकारणीची बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडत आहे. राज्यभरातून 1400 कार्यकर्ते यामध्ये सहभागी झालेले आहेत. परमबीर सिंह यांच्या लेटरप्रकरणी अजित पवारांचीही सीबीआय चौकशी व्हावी, असा ठराव या कार्यकारणीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. अत्यंत तिखट शब्दात त्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडत आहेत, माझ्यासमोर असा प्रश्न आहे की, महाराष्ट्रात जे सुरुय त्याला सरकार म्हणता येईल का?

सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. हे कसलं महाराष्ट्र मॉडेल आहे? देशात कोविडने मेलेला प्रत्येक तिसरा व्यक्ती महाराष्ट्रातील आहे. हे मॉडेल म्हणजे मृत्यूच्या सापळ्याचे मॉडेल आहे. पुढे ते म्हणाले की, मंत्री आपापल्या विभागाचे राजे झाले आहेत आणि प्रत्येक विभागात एक 'वाझे' आहे. वेगवेगळ्या विभागातले वाझे अजून बाकी आहेत, आणि त्यांचा पत्ता आमच्याकडे आहे. म्हणूनच अधिवेशन दोन दिवसांचं होतंय आपला भ्रष्टाचार आणि गोंधळ बाहेर येईल या भीतीमुळे सरकार अधिवेशनापासून पळ काढतंय. भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार यांनी बरबटलेलं हे सरकार आहे. या सरकारमधला मंत्रीही स्वत:ला मुख्यमंत्री समजतो. रोज निर्णय होतात एका तासात स्थगिती पुन्हा मंजूरी मिळते. हे सरकार आहे सर्कस आहे? असा प्रश्न पडतोय.

कोविडचे सर्वांत जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मृत्यूच्या सापळ्याचं महाराष्ट्र मॉडेल या सरकारने तयार केलंय. मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे का? असा प्रश्न पडतो. महाराष्ट्रात जे चाललंय त्याला सरकार म्हणता येईल का? हे तर वसुली सरकार आहे. पुढे ओबीसी आरक्षण प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं. ते म्हणाले की, ओबीसी आरक्षण केवळ या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलंय. सरकारने मागील 15 महिन्यात मागासवर्गीय आयोगाची स्थापन केलाच नाही. आमचं राज्य असतं तर चार महिन्यात ओबीसीचं आरक्षण परत आणून दिलं असतं. भारतीय जनता पार्टी 26 तारखेचं आंदोलन करुन शांत बसणार नाही. त्यामुळे आता संघर्ष अटळ आहे. जर ओबीसीला फसवाल तर खबरदार भाजप शांत बसणार नाही. लोकशाहीमध्ये विधानमंडळाचं दारं यांनी बंद केलंय, हे सरकार पळपुटं असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT