former cm uddhav thackeray
former cm uddhav thackeray  esakal
महाराष्ट्र

हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं

धनश्री ओतारी

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच मीडियासमोर आले. यावेळी त्यांनी भाजप सह एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

'मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याचे बोलले जात आहे, ते चुकीचे आहे. तथाकथिक शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं म्हणजे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असे नाही,' अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. (former cm uddhav thackeray criticised bjp and cm eknath shinde)

कालच मी नव्या सरकारच अभिनंदन केलं. अस म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. अडीच वर्षापूर्वी मी अमित शहा यांना अडीच वर्षाचा फॉर्मुला सांगितला होता.

मी अडीच वर्षाचा करार करायला तयार होतो. अडीच अडीच वर्षाचा काळ वाटून घ्यावा अस ठरल होत. याबद्दल अमित शहांनी मला वचन देखील दिल होत. पण त्यांनी त्यांचा शब्द मोडला. ठरल्याप्रमाणे केल असत तर भाजपला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळाल असत. पण अमित शहा यांनी दगा दिला.

आज अडीच वर्ष पूर्ण होत आहेत. जे आज केलं ते अडीच वर्षापूर्वी का केलं नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना केला. आणि माझ्या पाठीत खंजीर खुपसला तो मुंबईच्या काळजात नको असे भावनिक आवाहनदेखील ठाकरेंनी यावेळी दिले.

काल जे घडले ते मी अमित शहांना अडीच वर्षे शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून आधीच सांगत होतो आणि तेच झाले. असा पुर्नउच्चार करत त्यांनी हे आधी केले असते तर महाविकास आघाडीचा जन्म झाला नसता. ज्या पद्धतीने सरकार बनवण्यात आलं आणि शिवसेनेच्या एका तथाकथित कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवण्यात आलं, तेच मी अमित शहांना सांगितलं. हे आदरपूर्वक करता आले असते. शिवसेना अधिकृतपणे त्यावेळी तुमच्यासोबत होती. पण त्यावेळी शहांनी शब्द मोडला. असा आरोप ठाकरेंनी यावेळी शहांवर केला. अमित शाहांनी शब्द पाळला असता, तर सरकार शानदार असतं.

मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याचे बोलले जात आहे, ते चुकीचे आहे. तथाकथिक शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं म्हणजे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असे नाही.

आता सरकार वरती - खालती तुमचेच आहे. कांजुरचा प्रस्ताव दिला होता, ही जमीन मुंबईकरांची. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळु नका. लोकशाहीचे चार स्तंभ... हे चार स्तंभ आता पूढे यायला हवे. लोकशाहीचे धिंडवडे थांबवण्याची गरज आहे, ज्याने मत दिले त्याचा बाजार असा मांडला गेला तर ते चुकीचे आहे. मतदाराचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल.

मी महाराष्ट्रातील तमाम जनतेचा ऋणी आहे, अस क्वचितच होत असेल की एखादा माणूस जो अचानक आला तो पद सोडताना लोकांच्या डोळ्यात अश्रु येतात. हीच माझ्या आयुष्याची कमाई असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तुमच्या डोळ्यातील अश्रूंशी माझ्याकडून कधीही प्रतारणा, गद्दारी होणार नाही. तुमचे हे अश्रू माझी ताकद आहे. सत्ता येवो सत्ता जावो या ताकदीशी मी कदीही प्रतारणा करणार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT