महाराष्ट्र बातम्या

माजी सहकारमंत्री देशमुख म्हणाले; राज्याबरोबर सोलापुरातही नाही समन्वय 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः राज्यात तिघांचे सरकार असल्याने त्यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे अनागोंदी कारभार सुरू आहे. तशीच काहीशी स्थिती सोलापुरात आहेत. येथील तीन प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने बिकट परिस्थिती झाल्याची टीका माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी केली. 

केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त सरकारच्या वर्षभराच्या कार्याची माहिती देण्यासाठी लोकमंगल बॅंकेत आयोजित पत्रकार परिषदेत आमदार देशमुख बोलत होते. यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राजकुमार पाटील उपस्थित होते. 

आमदार देशमुख म्हणाले, केंद्राने कोरोनासाठी राज्याला जवळपास 28 हजार 104 कोटी रूपये विविध स्वरूपात दिले आहेत. अजूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप मदत करण्यास तयार आहे. मात्र तिघांचे सरकार असल्याने त्यांच्यात समन्वय नाही. सोलापुरातही तशीच स्थिती आहे. येथील अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नाही. जिल्हाधिकारी एक आदेश काढतात तर पोलिस आयुक्त एक आदेश काढतात. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. या दोघांसह पालिका आयुक्त, सिव्हीलचे वैद्यकीय अधीक्षकांनी एकत्र येऊन निर्णय घेतल्यास शहराची परिस्थिती नक्की सुधारेल. 

केंद्रातील सरकारबाबत आमदार देशमुख म्हणाले, वर्षभरात कलम 370 रद्द करणे, तिहेरी तलाकवर बंदी, राम मंदिराच्या बांधकामासाठी ट्रस्ट स्थापन करून बांधकाम सुरू, नागरिकत्व सुधारणा कायदा यासह अनेक ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतले आहेत. याशिवाय कोरोना काळात आत्मनिर्भर योजनेतून एक लाख 70 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. राज्याला कोरोनासाठी 28 हजार 104 कोटींची मदत केली आहे. केंद्र सरकारने जनतेचा विश्‍वास सार्थ ठरवला आहे. 

पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारीही बदला 
सोलापुरात स्थानिक पालकमंत्री असता तर चित्र वेगळे दिसले असते. दोन पालकमंत्री बदलले. कोरोनासाठी तिसऱ्या पालकमंत्र्यांची नेमणूक केली. मात्र, तरीही फरक पडला नाही. त्यामुळे त्यांचीही आता बदली करावी. दुसरीकडे एवढा हताश जिल्हाधिकारी आम्ही पाहिलेला नाही. त्यामुळे त्यांचीही बदली करण्याची मागणी केली आहे. 
शहाजी पवार, जिल्हाध्यक्ष 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident In Kagal : नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा, रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी येताना विवाहितेचा भीषण अपघात; दोन्ही मुले झाली आईविना पोरकी

India Sports Economy: भारतीय क्रीडा अर्थव्यवस्था २०० कोटी डॉलर पार; २०२५ वर्षामध्ये १३.४% वाढ; क्रिकेटचा वाटा सर्वाधिक ८९ टक्क्यांचा

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

Chhatrapati Sambhajinagar: जुन्या शहरात पुन्हा धावणार स्मार्ट बस – पर्यटक व नागरिकांसाठी सुविधा वाढवणार

Yavatmal News : एमपीएससी पूर्वतयारी परीक्षेत यश न मिळाल्याने विद्यार्थ्यांने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT