former district president Ashok Nimbargi Big statement BJP joins Congress 
महाराष्ट्र बातम्या

BJP : 'पक्षाअंतर्गत गटबाजीमुळे मी वैतागलो',भाजपच्या माजी शहराध्यक्षांचा मोठा खुलासा

भाजपच्या माजी शहराध्यक्षांच्या वक्तव्याने भाजपच्या गोटात खळबळ

धनश्री ओतारी

सोलापूर शहर काँग्रेसचा निर्धार मेळावा रविवारी (ता. २१) पार पडला. यावेळी भाजपच्या माजी शहराध्यक्षांने काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. तसेच यावेळी पक्षाअंतर्गत गटबाजीमुळे मी वैतागलो अशा मोठा खुलासादेखील केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (former district president Ashok Nimbargi Big statement BJP joins Congress)

भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. आता भाजपची विचारधारा बदलल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रा. निंबर्गी म्हणाले, "आम्ही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्या विचाराने प्रेरित होऊन भाजपमध्ये आलो.पण, आता तो विचार आम्हाला शोधूनही सापडत नाही. पक्षाअंतर्गत गटबाजीमुळे अनेकजण वैतागले आहेत. त्यामळेच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे." असे निंबर्गी म्हणाले.

भाजपचा वचननामा कसा तयार होतो, हे आम्हाला चांगलेच माहिती आहे. वचननाम्याच्या माध्यमातून भाजप नेहमीच लोकांना वेड्यात काढत आले आहे. कुणी चंद्र मागत असेल, तरी त्याला निवडणूक होईपर्यंत देतोच म्हणायचे. नाही हा शब्दच वापरायचा नाही.

असा वचननामा आम्ही वरिष्ठांच्या सांगण्यावरून तयार करायचो. अशा गौप्यस्फोटदेखील भाजपच्या माजी शहराध्यक्षाने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT