former minister anil deshmukh bail stay extended cbi mumbai high court  esakal
महाराष्ट्र बातम्या

Anil Deshmukh : जामीन मंजूर होऊनही देशमुखांचा कारागृहात मुक्काम वाढला!

सकाळ डिजिटल टीम

अनिल देशमुख यांच्या जामीनावरील स्थगीती हायकोर्टाने वाढवली आहे. सीबीआयची विनंती हायकोर्टाने मान्य केली आहे. जामीन मंजूर होऊनही देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढणार आहे.

अनिल देशमुख यांच्या जामिनावर दिलेली स्थगिती कायम ठेवावी य़ासाठी सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची १२ डिसेंबर रोजी जामिनावर सुटका केली.

सीबीआयची मागणी हायकोर्टाने मान्य करत जामीनाला दिलेली स्थगिती २७ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत विनंती केली होती की, न्यायालय हे नाताळच्या सुट्टीनिमीत्त जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बंद आहे. त्यामुळे देशमुखांच्या जामीनाला दिलेल्या आवाहनावर सुनावणी होऊ शकत नाही, यामुळे स्थगिती वाढवून द्यावी अशी मागणी केली होती.

सध्या सुरु असलेल्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरात सुरू आहे. या अधिवेशनात अनिल देशमुख यांनी आसन व्यवस्थेत देखील स्थान देण्यात आले होते. मात्र आता अनिल देशमुख अधिवेशनाला हजर राहू शकणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT