Nawab Malik  News
Nawab Malik News Sakal
महाराष्ट्र

Nawab Malik : नवाब मलिकांचा कोठडीतील मुक्काम वाढला, आणखी 'इतके' दिवस जेलवारी

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक असलेले माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली.

माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या कोठडीमध्ये १४ दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांच्या जेलमधला मुक्काम वाढला आहे.

मलिक यांना मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक झाली आहे. आतापर्यंत अनेकदा त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मलिक यांनी सर्व आरोपांचे खंडन केले आहे. मात्र त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख काही दिवसांपूर्वी जेलबाहेर आले होते. देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर आर्थर रोड कारागृहातून देशमुख यांची २८ डिसेंबर रोजी सुटका झाली. त्यानंतर ईडीच्या कार्यालयात हजेरी लावण्यासाठी देशमुख गेले होते.

दुसरीकडे नवाब मलिक यांच्या अडचणी कमी होत नसल्याचं दिसून येत आहे. मलिकांच्या कोठडीमध्ये आज कोर्टाने १४ दिवसांची वाढ केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT