Ashok Chavan Resignation 
महाराष्ट्र बातम्या

Ashok Chavan Resignation: दुसरी विकेट पडली! अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याचा राजीनामा

राजूरकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडं आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : अशोक चव्हाण यांच्यानंतर आता काँग्रेसच्या आखणी एका माजी आमदारानं देखील काँग्रेसला रामराम केला आहे. या नेत्यानं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडं आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. सकाळपासूनच काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा सुरु होती. (former mla amar rajurkar resigns from congress after ashok chavan)

अशोक चव्हाण यांनी सकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा त्यांच्याकडं सोपवला. त्यांच्या आणि नार्वेकरांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यानंतर चव्हाणांसोबत इतरही डझनभर आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.

यांपैकी विधानपरिषदेचे माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी देखील आपल्या नांदेड शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदाचा तसेच काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. (Latest Marathi News)

चव्हाणांनी दिलं स्पष्टीकरण

चव्हाण म्हणाले, "मला कुठलीही पक्षांतर्गत जाहीर वाच्यता करायची नाही. कुणाचाही उणीदुणी काढायची नाही. मी काँग्रेसमध्ये अनेक वर्षे काम केलं आहे. आता वेगळ्या पर्यायाचा विचार करायला हवा. म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. मी उद्याप इतर कुठल्याही पक्षात सामिल होण्याचा निर्णय घेतलेला नाही. प्रत्येक गोष्टीचं कारण सांगितलं जाऊ शकत नाही. मी काल संध्याकाळपर्यंत पक्षाच्या बैठकीत सहभागी होतो"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT