Former MLA HarshVardhan Jadhav esakal
महाराष्ट्र बातम्या

Harshvardhan Jadhav : महिलेचे आमदारावर गंभीर आरोप; शेअर केला मारहाणीचा व्हिडीओ

सकाळ डिजिटल टीम

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव अडचणीत आले आहेच. हर्षवर्धन यांच्यावर सहकारी ईशा झा यांनी व्हिडीओ शेअर करत मारहाणीचा आरोप केला आहे. संशय घेऊन जाधव यांनी बेदम मारहाण केल्याचे ईशा झा यांचे म्हणणे आहे. तसेच, याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचेही म्हटले आहे. (Former MLA HarshVardhan Jadhav Has Been Accused Of Being Beaten Up By Esha Jha While Posting A Video )

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे नेहमी चर्चेत असतात. मागील लोकसभेनंतर मात्र त्यांच्या नावापुढे वाद दिसून येत होता. यातच त्यांच्यासोबत राहणाऱ्या ईशा झा यांनी हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात मारहाण केल्याची तक्रार दाखल केल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ईशा झा यांनी आपबिती कथन केली आहे.

जाधव माझ्यावर नेहमी संशय घेत होते, घरातील एका मुलांसोबत माझे नाव जोडले होते. जाधव बाहेर काय काय घाणेरडे पणा करतात, असा आरोप झा यांनी केला आहे. तर दुसरीकडे जाधव यांच्याकडून मला जबर मारहाण झाली, असा आरोपही झा व्हिडीओमध्ये करताना दिसून येत आहे. आता मी कन्नडमध्ये थांबणार नाही ये असे म्हणत ईशा झा यांनी म्हटले आहे.

काय म्हणाल्या आहेत ईशा झा?

हर्षवर्धन यांनी मला बेदम मारहाण केली, केस ओढले, मुका मार दिला. मला हे सहन होत नाही. माझे नाव इतरांशी जोडून ते नेहमीच संशय घेतात. स्वत: मात्र बाहेर घाण करतात व मला त्रास देतात. ते बदलतील असे वाटत होते, पण आता सहन होत नाही. मी पोलिसांत तक्रार दिलीय, माहीत नाही काय होईल ते. पण मी आता कन्नड सोडून चाललेय, पुन्हा कधीच येणार नाही.’

दरम्यान, हर्षवर्धन यांनी सांगितले, ‘आमचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आणून इतरांनी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकाच्या घरी भांडणे होतात. पण सातत्याने आमच्या कुटुंबाबाबतच बोलले जाते. विरोधकांनी आधी त्यांच्या घरात काय चाललेय ते पाहावे.

कोण आहे ईशा झा?

पुण्यात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर ईशा झा चर्चेत आहेत. तेव्हापासून ईशा झा या हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत प्रत्येक राजकीय कार्यक्रमात, बैठकीत दिसत आहेत.ईशा झा या मुळच्या बिहारच्या असल्याचं सांगितले जाते. पण त्या वाढल्या मुंबईतच. त्याचे शिक्षण एमएस क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये झाले आहे. त्या मानसोपचार तज्ज्ञ आहेत. पुण्यात त्या माईंड ओशन नावाचं क्लिनिक चालवतात. पुण्यात ईशा झा यांची प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ म्हणून ओळख आहे. तसंच क्रोध व्यवस्थापनातही त्यांचे मोठं नाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT