Laxman Mane Raj Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

मशिदीवरील भोंग्याबाबत अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरेंची औकात काय?

प्रशांत घाडगे

'संविधानावर आक्रमण करून भाजपनं देशभरात धुडगूस घातलाय.'

सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी सर्व जातींचा अभ्यास करून भारतीय संविधान (Indian Constitution) तयार केलं असून, ते सर्वोच्च आहे. त्या संविधानावर आक्रमण करून भाजपनं देशभरात धुडगूस घातला आहे. याचबरोबर राज्य शासनाला मशिदीवरील भोंग्या संदर्भात अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरे यांची औकात काय आहे? घटनेनं सर्व धर्मांना स्वातंत्र्य दिलं असताना सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर आपण स्वतः वेळप्रसंगी गुन्हा दाखल करू, असा इशारा माजी आमदार लक्ष्मण माने (Former MLA Laxman Mane) यांनी पत्रकार परिषदेत दिला.

शासकीय विश्रामगृहात आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला.‍ श्री. माने म्हणाले, ‘‘मनसे (Maharashtra Navnirman Sena, MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केवळ ठाकरे घराण्यात जन्म घेण्याव्यतिरिक्त देशाच्या जडणघडणीत काय योगदान दिलं आहे. त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे परिवर्तन चळवळीचे एक मोठे नेतृत्व होते. त्यांच्या विचारसरणीचा आदर्श राज ठाकरे यांनी घ्यावा. राज्यभरातील भोंग्यांसदर्भात राज ठाकरे यांचे वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणारे आहे.

भारतीय दंड विधानाप्रमाणे हा फौजदारी गुन्हा असून, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करायला पाहिजे.’’ कोणाची तरी सुपारी घेऊन राज ठाकरे काम करत आहेत. घटनेच्या विरोधात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांचा प्रतिकार केलाच पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या देशात फाळणी सदृश्य परिस्थिती निर्माण करायची आहे का? आणि हा अधिकार त्यांना कोणी दिला, असा सवाल मानेंनी केलाय.

‘आम्ही सारे भारतीय’ अभियान

येत्या २१ तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘आम्ही सारे भारतीय’ असे राज्यव्यापी अभियान सुरु करणार आहे. महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांमध्ये टप्प्या-टप्प्याने अभियान राबविणार असून, त्याची सुरुवात २१ रोजी सकाळी ११ वाजता सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून करणार असल्याचे लक्ष्मण माने यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Abuse: ऑर्केस्ट्रा, डान्स ग्रुप आणि स्पामध्ये बालकामगारांवर बंदीची मागणी; सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि NHRC ला नोटीस

‘पेद्दी’मधील राम चरण, जान्हवी कपूर आणि श्रुती हासन यांचे धमाकेदार डान्स नंबर ‘हेल्लाल्लालो’ रिलीज!

Kolhapur Accident : गगनबावड्यात भरधाव ट्रकचा कहर; दुचाकीस्वार ठार, सात वाहनांचे नुकसान व दोन गायींचा मृत्यू

Farmer Endlife : व्याजाच्या पैशांच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले; पाच सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल

Strait of Hormuz: 'होर्मुज'ची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणने घातली 'ही' अट; जगभरातले देश टेंन्शनमध्ये

SCROLL FOR NEXT