महाराष्ट्र बातम्या

सोलापुरातील माजी आमदारासही कोरोनाची लागण

विजयकुमार सोनवणे

सोलापूर - येथील माजी महापौर आणि ज्येष्ठ माजी आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा अहवाल आज  शनिवारी पॅाझिटीव्ह आला.  

सोलापूरच्या महापौरपदी बिनविरोध निवडून आलेले हे आमदार विधान परिषदेचे सदस्यही होते. एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांशी त्यांचा दांडगा संपर्क आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात घेऊन गेल्यावर किमान अर्धा तास त्यांना बाहेर बसविण्यात आले होते. ही बाब त्यांच्यासमवेत आलेल्या कार्यकर्त्याने एका माजी महापौरांच्या कानावर घातली. त्यानंतर सूत्रे हालली आणि माजी आमदारांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले.

दरम्यान हे माजी आमदार रुग्णालयात दाखल झाल्यावर पक्षाध्यक्षांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी रुग्णालयात होत असलेल्या दुर्लक्षाबद्दलची माहिती त्यांनी अध्यक्षांना दिली. त्यामुळे अध्यक्षांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितल्याची चर्चा आहे. माजी आमदारांचा अहवाल पॅाझीटीव्ह आल्याने त्यांच्या कुटुंबियांच्या स्वॅबची तपासणी दुपारी करण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI Action : एव्हरेस्ट जिरे पावडरची ‘ही’ बॅच वापरू नका; कीटकनाशकांचे अवशेष मर्यादेपेक्षा जास्त आढळले, FSSAI ने दिले रिकॉलचे आदेश

IND vs WI T20I: वेस्ट इंडिजच्या ट्वेंटी-२० संघात बदल; भारताला झोडणाऱ्या खेळाडूची एन्ट्री, तिसरी वन डे जिंकल्यावर आलाय कॉन्फिडन्स...

सार्वजनिक स्वच्छतागृहात अल्पवयीन तरुणांची नशापार्टी, ड्रग्सचा डबल डोस घेताच १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; चक्रावणारा व्हिडिओ Viral

‘लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं बरोबर!’ किरण राव यांचं मांडलं स्पष्ट मत; म्हणाल्या...

PM Kisan Scheme for Women Farmers : महिला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' अटी पूर्ण केल्यास खात्यात जमा होणार वार्षिक 6 हजार रुपये, जाणून घ्या पात्रता आणि नियम

SCROLL FOR NEXT