महाराष्ट्र बातम्या

मविआचे धर्म फक्त शिवसेनेनेच पाळायचे का? माजी आमदाराचा सवाल

शिवसेनेतील बंडखोर आमदारांनंतर आता माजी आमदारांनीही राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे

धनश्री ओतारी

शिवसेनेतील बंडखोर आमदारांनंतर आता माजी आमदारांनीही राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. माजी आमदार योगेश घोलप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. तसेच, शिवसेना स्वबळावर लढवणार, असा निर्धारही त्यांनी केला.

विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार योगेश घोलप यांनी एक फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. मविआ चे धर्म फक्त शिवसेनेनेच पाळायचे का? असा सवाल त्यांनी शिवसेनेला करत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

तसेच या पुढील माझ्या मतदारसंघातील सगळ्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार, असा निर्धारही त्यांनी केला.

माजी आमदार योगेश घोलप यांनी राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कुठल्याच कामात विचारात घेतले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळेच महाविकास आघाडीचे धर्म फक्त शिवसेनेने पाळायचे का असा संतप्त सवाल घोलप यांनी उपस्थित केला आहे.

घोलप कुटुंबियांचे मागील 30 वर्षांपासून देवळाली विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व आहे. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी पाच वर्ष तर मागील पंचवार्षिकमध्ये पुत्र योगेश घोलप यांनी एकहाती शिवसेनेचा भगवा फडकवला. माजी मंत्री बबनराव घोलप यांच्याकडे आता शिर्डी लोकसभेची जबाबदारी आहे. 2019 मध्ये भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या सरोज अहिरे यांनी योगेश घोलप यांचा पराभव केला. तेव्हापासूनच आजी-माजी आमदारांमध्ये सुप्त संघर्ष सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT