former mp adhalrao patil statement regarding permission for bullock cart races 
महाराष्ट्र बातम्या

'बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली खरी, पण…'; आढळराव पाटलांचा कोल्हेंना टोला

सकाळ डिजिटल टीम

सर्व राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बैलगाडा शर्यती (Bullock cart racing) बद्दल आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यामध्ये बैलगाडा शर्यतीला न्यायालयाने (Supreme Court on Bullock cart racing) काही अटी आणि नियम घालत परवानगी दिली असून या निर्णयामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा बैलगाडा शर्यतींचा धुराळा उडणार आहे. दरम्यान बैलगाडा शर्यतीवरून माजी खासदार आढळराव पाटील (Adhalrao Patil यांचा खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

आतुरतेने वाट पहात होतो..

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना (Bullock cart racing in Maharashtra) परवानगी मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना आढळराव पाटील म्हणाले की, बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी मिळाली खरी, पण याचं श्रेय जनतेने ठरवावं, श्रेय घ्यायला बाकीचे पुढे येतील पण मी मागे राहणार आहे. हे शेतकऱ्यांचं श्रेय आहे, राज्य शासनाचं हे खरं श्रेय आहे. ते पुढे म्हणाले की, माझ्या कानावर अजूनही विश्वास बसत नाही, ही आनंदाची गोष्ट आहे, यासाठी गेल्या 7 वर्षांपासून आतुरतेने वाट पहात होतो. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे विशेष आभार व्यक्त केले, तसेच ही शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद देणारी ही घटना असल्याचे ते म्हणाले.

बैलांवर अन्याय होतो म्हणून शर्यती बंद झाल्या नव्हत्या..

कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये चालू असताना आपल्याकडे का नाही? या मुद्द्यावर चर्चा झाली, सुप्रीम कोर्टाने चांगला निर्णय दिला आहे. बैलगाडा शर्यतीस मिळालेली परवानगी सशर्त असून बैलांवर अन्याय होतो या कारणाने बैलगाडा शर्यती बंद झाल्या नव्हत्या, तर बैलाचा समावेश पाळीव प्राण्यामध्ये केला आहे आणि पाळीव प्राण्यांना शर्यत किंवा प्रदर्शनात बंदी आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीवर बंदी आली होती. पेटाला हे आवडणार नाही, आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करणार आहोत, तुम्ही आम्हाला विरोध करु नका असेही ते म्हणाले.

काय म्हणाले होते अमोल कोल्हे..

सर्वोच्च न्यायालायने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्धी लढाई पार झाली आहे. आता भिर्र होणार, फक्त सर्वांनी नियम पाळून शर्यती घ्याव्यात असंही त्यांनी सांगीतलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT