Raju Shetti Sakal
महाराष्ट्र बातम्या

Raju Shetti : आजपासून साखरेचे एकही पोते कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही; राजू शेट्टींचा गर्भित इशारा

मंगळवारपासून (ता. १७) कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर ‘आत्मक्लेश यात्रा’ काढली जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

जनाची नाही तर मनाची लाज वाटून कारखानदार ४०० रुपयांचा दुसरा हप्ता देतील.

कोल्हापूर : ‘गेल्यावर्षीच्या उसाच्या (Sugarcane Rate) प्रतिटन ४०० रुपयांसाठी आजपासून (ता. ३) साखरेचे एकही पोते कारखान्याबाहेर (Sugar Factory) जाऊ देणार नाही. एखादा ट्रक, टेम्पो कार्यकर्त्यांनी अडवला तर याला संघटना जबाबदार राहणार नाही,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला.

येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, ‘गेल्या गळीत हंगामातील प्रतिटन ४०० रुपये मिळावेत या मागणीसह यंदाच्या गळीत हंगामातील दिशा ठरवण्यासाठी मंगळवारपासून (ता. १७) कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर ‘आत्मक्लेश यात्रा’ काढली जाणार आहे.

१७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर अशी २२ दिवस यात्रा काढून जयसिंगपूर येथे याच दिवशी २२ वी ऊस परिषद घेतली जाणार आहे. साखर कारखान्यांना ४०० रुपये देणे सहज शक्य आहे. स्वाभिमानीची मागणी चुकीची आहे असे म्हणता येत नाही. तरीही, साखर कारखाने हा दर देणार नसतील आणि सरकार याला पाठीशी घालत असतील तर ‘आत्मक्लेश’ केल्याशिवाय पर्याय नाही.'

शेट्टी पुढे म्हणाले, जनाची नाही तर मनाची लाज वाटून कारखानदार ४०० रुपयांचा दुसरा हप्ता देतील. गांधी जयंतीनिमित्त जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांवर ढोल बजावून त्यांना जागा करण्याचे काम केले आहे. उद्यापासून उग्र आंदोलन केले जाणार आहे. कारखाने सुरू झाल्यानंतर प्रतिक्विंटल दर ३३०० रुपये होता. सरकारने निश्‍चित केलेल्या दरापेक्षा कारखान्यांना ५०० रुपये दर मिळाले आहेत. ते शेतकऱ्यांना दिले पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रा. जालंदर पाटील, राजेंद्र गड्ड्यांवार, जनार्दन पाटील, स्वस्तिक पाटील उपस्थित होते.

अशी होणार आत्मक्लेश यात्रा

दत्त कारखाना, गुरुदत्त कारखाना, जवाहर कारखाना, शाहू कारखाना, हमीदवाडा कारखाना, संताजी घोरपडे कारखाना, बिद्री कारखाना, आसुर्ले-पोर्ले, वारणा कारखाना यामार्गे सांगली जिल्ह्यातील कारखान्यांवर आंदोलन केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : पहिल्या तुकडीतील एकूण अग्निवीरांपैकी ७५% अग्निवीर सशस्त्र दलांमधील आपला ४ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT