Former MP Shivajirao Adhalrao Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी : माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटलांची शिवसेनेतून हकालपट्टी

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.

पुणे : शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे (Shirur Lok Sabha Constituency) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) आदेशानं शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून (Shiv Sena Central Office) प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती देण्यात आलीय. शिवसेनेत बंडखोरी सुरू झाल्यानंतर पक्षाच्या काही नेत्यांनी बंडखोर आमदारांना समर्थन दिल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून कारवाईचं सत्र सुरू असून अनेक नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली जात आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत ३९ आमदारांची मोट बांधली आणि बंडाचा झेंडा हाती घेतला. परिणामी, उद्धव ठाकरे यांचं सरकार अल्पमतात आलं आणि ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला.

या बंडखोर शिवसेना आमदारांच्या आणि भाजपच्या (BJP) पाठिंब्यावर शिंदे यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशातच एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करणारे पोस्टर्स लावले जात आहे. तसंच सोशल मीडियावरूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मात्र, पक्षप्रमुखांचा फोटो न वापरता बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्यानंतर आणि त्यांचे समर्थन केल्याच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. आढळराव पाटील यांनी केलेल्या एका ट्वीटमुळं त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Tariff: ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकेलाच बसला! 446 कंपन्या दिवाळखोर; बेरोजगारीही वाढली

Asia Cup 2025: ना संजू, ना रिंकू... अजिंक्य राहणेनी निवडली भारताची प्लेइंग इलेव्हन, या संघाला रोखणे अवघड

Sangli News:'मराठा आरक्षणासंदर्भातील मुंबईत २९ ऑगस्टच्या मोर्चासाठी सांगलीत जिल्हाभर बैठका; मोठ्या संख्येने मुंबईला जाण्‍याचा निर्धार

Sangli News: ‘उरुण-ईश्वरपूर’ नामांतरप्रश्‍नी उपोषण स्थगित; सर्वपक्षीय राजकीय नेत्यांकडून घोषणा, बदलाची मागणी

Akola Traffic: अकोल्यात ७७ बेशिस्त ऑटोरिक्षांवर धडक कारवाई; ९०,५०० रुपये दंड वसुल, १७ ऑटो डिटेन

SCROLL FOR NEXT