महाराष्ट्र बातम्या

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीने झाला नाही, तर एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या बंदुकीतील गोळीने झाला होता, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केला होता.

करकरेंना मारणारा हा पोलिस अधिकारी, कसाब खटल्यातील सरकारी वकील उज्वल निकम यांच्याशी, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी देखील संबंधित होता, असे विधान वडेट्टीवार यांनी केले होते. यासंदर्भात रविवारी (ता.५) वडेट्टीवार यांना कोल्हापूरमध्ये पत्रकारांनी विचारणा केल्यावर त्यांनी या आरोपांची पुष्टी करताना एका पुस्तकाचा दाखला दिला. दरम्यान वडेट्टीवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे.

माजी पोलिस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकात हे सर्व आरोप करण्यात आले आहेत. मी त्यांचा पुनरुच्चार केला, असेही वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. तेलगी बोगस स्टँपपेपर घोटाळा उघड करणाऱ्या मुश्रीफ यांनी कसाबच्या अतिरेकी हल्ल्यानंतर, हू कील्ड करकरे, द रियल फेस ऑफ टेरिरिझम इन इंडिया हे पुस्तक लिहिले होते.

दरम्यान, भाजपचे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उज्वल निकम यांनीही या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना हे आरोप फेटाळून लावले. माझ्या प्रामाणिकपणावर शंका घेणारे हे आरोप ऐकून मी व्यथित झालो आहे. राजकीय फायद्यासाठी नेते एवढ्या पातळीला घसरतील, अशी मी कल्पना केली नव्हती. वडेट्टीवर या विधानांद्वारे केवळ माझा अपमान करीत नाहीत, तर या हल्ल्यात मरण पावलेल्या १६६ मृतांचा व शेकडो जखमींचाही अपमान करत आहेत, असे निकम यांनी सांगितले.

करकरे यांच्या हौतात्म्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दोषी धरणे म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार असल्याचे मत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले आहे. 'एक्स'च्या माध्यमातून लोढा यांनी वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे. देशभक्तांवर टीका करून दहशतवाद्यांचा उदो उदो करण्याची काँग्रेसची वृत्ती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मात्र बदनामीकारक विधाने करणाऱ्या वडेट्टीवार यांच्यावर गुन्हा दाखल करत तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी गलिच्छ पातळी गाठणाऱ्यांचा निवडणूक प्रचार करण्याचा अधिकार काढून घ्यावा, अशी मागणी लोढा यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT