Four office bearers of Youth Congress suspended maharashtra politics 
महाराष्ट्र बातम्या

Congress : युवक काँग्रेसचे चार पदाधिकारी निलंबित; बैठकीत खुर्च्या फेकणे भोवलं

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरु

धनश्री ओतारी

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरु आहे. अशातच, युवक काँग्रेसचे चार पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Four office bearers of Youth Congress suspended maharashtra politics)

मुंबई येथे झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी चांगलाच गोंधळ घातला. यावेळी एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्याचाही प्रकार घडला. या प्रकरणी राष्ट्रीय अध्यक्षांनी राडा करणाऱ्या चार पदाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.(Latest Marathi News)

नेमकं घडलं काय?

प्रदेश उपाध्यक्ष तनवीर विद्रोही व सचिव इरशाद शेख यांचा निलंबित केलेल्यांमध्ये समावेश आहे. शनिवारी मुंबई येथे युवक काँग्रेसची कार्यकारिणी बैठक पार पडली. यात प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात प्रचंड असंतोष उफाळून आला होता.(Latest Marathi News)

काही कार्यकर्त्यांनी कुणाल राऊत यांना हटवण्याची मागणी केली. सोबतच खुर्च्यांची फेकाफेक करून मोठा राडा केला होता. मुंबई येथे झालेल्या बैठकीत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.वी. श्रीनिवास हेसुद्धा उपस्थित होते. नाराज होऊन ते तत्काळ दिल्लीला निघून गेले होते.

या प्रकारानंतर चार पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करून राडेबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांना दिला आहे. (Latest Marathi News)

तनवीर विद्रोही, इरशाद शेख यांच्यासह कराड दक्षिणचे अध्यक्ष दिग्विजय पाटील व प्रदेश सचिव उमेश पवार यांना निलंबित करण्यात आले आहे. बी.वी. श्रीनिवास यांनी हे प्रकरणामध्ये गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT