वेश्या व्यवसाय sakal
महाराष्ट्र बातम्या

वेश्या व्यवसाय करणाऱ्या चौघींची सुटका! अकलूज-महाळुंग रोड आणि सोलापूर शहरात कारवाई; पीडिता म्हणाली, ‘तो माझा बॉयफ्रेंड’, पण नावच माहिती नव्हते, वाचा...

अकलूज-महाळुंग रोडवरील लयभारी लॉज आणि एका नव्या इमारतीत सुरू असलेल्या कुंटणखान्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी छापे टाकले. आधी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री केली. दोन्ही ठिकाणाहून तीन पीडितांची सुटका करण्यात आली असून चौघांविरुद्ध अकलूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : अकलूज-महाळुंग रोडवरील लयभारी लॉज आणि एका नव्या इमारतीत सुरू असलेल्या कुंटणखान्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी छापे टाकले. आधी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री केली. दोन्ही ठिकाणाहून तीन पीडितांची सुटका करण्यात आली असून चौघांविरुद्ध अकलूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध टिमला अकलूज-महाळुंग रोडवरील कुंटणखान्याबद्दल गोपनीय माहिती मिळाली होती. त्याआधारे अकलूज पोलिसांना कोणतीही खबर न देता या पथकाने दोन्ही ठिकाणी छापे टाकले. त्यातील लयभारी लॉजमध्ये एक पीडिता तर याच रोडवरील एका नव्या इमारतीत दोन पीडिता आढळल्या. त्यांची सुटका करून त्यांना स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी डांबून ठेवून वेश्या व्यवसाय करायला भाग पाडणाऱ्या चौघांविरुद्ध अकलूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक भिताडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक रेवणसिद्ध काळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक सविता कोकणे, शारदा घोळवे, विश्वजित हंचे, हवालदार प्रविण वाळके, शिवाजी माळी, चालक रामनाथ बोंबिलवार यांच्या पथकाने पार पाडली.

ग्राहकाला फोटो दाखवून पीडिता बोलावतात

कुंटणखान्यावर तरुणी-महिला जास्त राहिल्यास कोणीतरी पोलिसांना माहिती देईल आणि कारवाई होईल, अशा भीतीतून वेश्या व्यवसायाचे स्वरुप बदलले आहे. ग्राहकांना मोबाईलमधील तरुणी-महिलांचे फोटो दाखविले जातात. त्यांच्या पसंतीनुसार संबंधित पीडितेला बोलावून घेतले जाते, अशा बाबी कारवाईतून समोर आल्या आहेत. दुसरीकडे कारवाईत अनेकदा पीडिता परराज्यातील आढळतात. त्यांच्याकडे दोन आधारकार्ड आढळतात, एक पत्ता बदललेले आणि दुसरे त्यांचे मूळ, अशीही बाब निदर्शनास आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पीडिता म्हणाली, ‘तो माझा बॉयफ्रेंड’

कुंटणखान्यावर छापा टाकल्यानंतर पोलिसांनी एका पीडितेला ताब्यात घेतले. त्यावेळी पीडितेने तेथील तरूण माझा बॉयफ्रेंड असल्याचे पोलिसांना सांगितले. तेव्हा तिला त्या बॉयफ्रेंडचे नाव काय आहे सांग, असे म्हटल्यावर नाव सांगता आले नाही, असा किस्सा पोलिसांनी सांगितला.

सोलापूर शहरातही घरगुती कुंटणखान्यावर कारवाई

सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील संगमेश्वर नगरातील साक्षी रेसिडेन्सीतील घरात कुंटणखाना चालू होता. पोलिसांना याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (ता. ८) सापळा रचून बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी त्याठिकाणी कारवाई केली. यात नंदिनी गोरख कांबळे (वय ५०) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी पीडितेची सुटका केली. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलिस निरीक्षक स्नेहल म्हेतर यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Ramdev Kangana Ranaut : बाबा रामदेव यांचा कंगना रणौतवर पलटवार; म्हणाले, ‘अशा लोकांबद्दल टिप्पणी करायची नाही’

Bank Strike: सलग 5 दिवस बँका बंद? सप्टेंबरमध्ये पुन्हा संप; पाहा ताजी अपडेट

Sugar Rate : दिवाळीपर्यंत साखर शंभरी पार जाण्याची भीती; राज्यात १८ लाख टन साठा शिल्लक

Marathi News Live Updates : राज्याचे आरोग्यमंत्री अमरावतीत दाखल, डफरिन रुग्णालयाची करतायेत पाहणी

माझी इच्छा नव्हती सुनीधीकडून गाऊन घ्यायची... अवधूत गुप्तेने सांगितली 'कांदे पोहे' गाण्याची कथा; मराठी अभिनेत्रीने आधीच गायलेलं गाणं

SCROLL FOR NEXT