रिक्षा solapur news esakal
महाराष्ट्र बातम्या

रिक्षातील महिलेचे दागिने चोरणाऱ्या चौघी पकडल्या! चौघी एकदम रिक्षात बसल्या, दागिने चोरून वाटेतच उतरल्या; सोलापूर शहर पोलिसांनी त्यांना पकडले अन्‌...

सोलापुरातील सात रस्ता येथून सोरेगावकडे रिक्षात बसून जात असताना वाटेत काशीबाई कमलाकर पाटील (वय ४५, रा. कल्याणनगर भाग-२, जुळे सोलापूर) यांच्या पिशवीतील मंगळसूत्र, बोरमाळ चोरीला गेली. पिशवीत ठेवलेली दागिन्यांची डबी गायब झाल्याने काशिबाईंनी सदर बझार पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तपास करून काही तासांत दागिने चोरणाऱ्या चार महिलांना पकडले.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापुरातील सात रस्ता येथून सोरेगावकडे रिक्षात बसून जात असताना वाटेत काशीबाई कमलाकर पाटील (वय ४५, रा. कल्याणनगर भाग-२, जुळे सोलापूर) यांच्या पिशवीतील मंगळसूत्र, बोरमाळ चोरीला गेली. पिशवीत ठेवलेली दागिन्यांची डबी गायब झाल्याने काशिबाईंनी सदर बझार पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तपास करून काही तासांत दागिने चोरणाऱ्या चार महिलांना पकडले. त्यांच्याकडून चोरीचे दागिनेही हस्तगत केले आहेत.

सोलापुरातील कल्याण नगरातील काशीबाई पाटील या ३ ऑगस्टला दुपारी साडेबाराच्या सुमारास रिक्षातून सोरेगावकडे जात होत्या. त्यांनी चोरीच्या भीतीने सोन्याची बोरमाळ व मणीमंगळसूत्र एका डबीत ठेवले होते. एका कापडी पिशवीत ती डबी ठेवली. विजापूर रोडवरील धर्मवीर संभाजी तलावाजवळ अचानक रिक्षात मोठी गर्दी आहे म्हणून रिक्षातील चार महिला खाली उतरल्या. त्यावेळी काशीबाईंना संशय आला. काही अंतरावर गेल्यावर त्यांनी दागिने तपासले, पण कापडी पिशवीत ना डबी होती ना दागिने. त्यानंतर त्यांनी सदर बझार पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी संशयित महिलांचा शोध सुरू केला.

सीसीटीव्ही कॅमेरे पडताळले आणि पोलिसांना संशयित महिलांची ओळख पटली. ममता संभाजी भोसले, सुषमा बापू भोसले, शैला नाशिक पवार व पद्मिनी या महिलांनी दागिने चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर आधीचेही गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी चौघींकडील चोरलेले दागिने हस्तगत केले. महिला असल्याने आणि चोरीतील १०० टक्के मुद्देमाल मिळाल्याने पोलिसांनी त्यांना नोटीस देऊन सोडून दिले.

चौघींची चोरीची अशी होती पद्धत...

एकट्या महिलेला गाठून तिच्यासोबत एका ठिकाणाहून रिक्षात बसायचे. रिक्षाचे पैसे उतरताना द्यावे लागतात, त्यामुळे काही अंतरापर्यंत प्रवास करायचा. त्यानंतर खूपच दाटी होत आहे, गर्दीमुळे व्यवस्थित बसता येत नसल्याचे सांगून त्या महिला वाटेतच अचानक रिक्षा थांबवून खाली उतरायच्या. काही वेळातच त्या तेथून पसार व्हायच्या. ज्या प्रवाशाची चोरी केली, त्याला काही समजण्यापूर्वीच त्या पसार व्हायच्या, अशी त्यांची चोरीची पद्धत समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT