Fractured Freedom Sakal
महाराष्ट्र बातम्या

Fractured Freedom : राज्य सरकारचा यु-टर्न अन् पुरस्कार वापसीचा खेळ

राज्य सरकारने दिलेला पुरस्कार मागे घेतला असून निवड समितीही रद्द करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

फ्रॅक्चर्ड फ्रीडम, तुरुंगातील आठवणी व चिंतन या पुरस्काराला मराठी अनुवादासाठी राज्य शासनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मात्र काही वेळात तो परत घेतला आणि निवड समितीही बरखास्त केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

प्रौढ वाङ्मयामध्ये अनुवादित प्रकारासाठी कोबाड गांधी लिखित फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन या पुस्तकाच्या मराठी अनुवादाला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. पण राज्य सरकारने हा पुरस्कार रद्द केला आहे. तर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने स्थापलेली समितीही रद्द करण्यात आली आहे. या वरुन आता या पुस्तकाच्या अनुवादक अनघा लेले यांनी आपली भूमिका मांडत शासनावर टीका केली आहे. अनघा लेलेंची फेसबुक पोस्ट खालील प्रमाणे -

तर वेगवेगळ्या प्रकारात एकूण ३३ लेखकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यातले लेखक शरद बाविस्कर हे सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असून तरुणाईमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांनी अनघा लेलेंच्या समर्थनार्थ आपला पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. शरद बाविस्कर यांनी फेसबुकवर पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे. अनेकांनी त्यांच्या या भूमिकेचं कौतुक करत त्यांना समर्थनही दिलं आहे. बाविस्करांची पोस्ट खालीलप्रमाणे -

पुरस्कार रद्द करण्याची पद्धत काय होती? कुठल्या तज्ञांची समीती गठीत करण्यात आली होती? रद्द करण्यामागे शास्त्रीय, साहित्यिक आणि नैतिक आधार कुठले? रद्द करताना जनतेला शास्त्रशुद्ध पद्धतीने स्पष्टीकरण दिलं का? का फक्त तुमच्या कोत्या मनात आलं आणि तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून फासीवादी पद्धतीने जीआर काढून पुरस्कार रद्द केला? असे प्रश्न शरद बाविस्कर यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT