Aditya esakal
महाराष्ट्र बातम्या

ठाकरेंच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न..

आदित्य ठाकरें भासवून गंडा घालण्याची तयारी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव वापरुन दादरच्या एका तरुणाकडे आर्थिक मदत मागितल्याचं उघडकीस आलं आहे. एका आंतरराष्ट्रीय कुस्ती पटुला अनोळखी नंबर वरून आदित्य ठाकरे असल्याचे भासवत पैसे उकळण्याच्या प्रयत्ना विरूद्ध गुन्हा दादर पोळी ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

कुस्तीपटूची फसवणूक

दिपेश जांबळे या कुस्तीपटूने दादर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. वरळी कोळीवाडा येथील 24 वर्षीय दिपेश जांभळे या कुस्तीपटूने आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये पदकं मिळवली आहेत. दरम्यान त्याचा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या हस्ते सन्मान देखील झालेला आहे.

दिपेश जांबळे याला 23 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास व्हॉट्सअॅपवर मेसेज आला. व्हॉट्सअॅप स्टेटसवरील डिस्प्ले पिक्चरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचा फोटो होता.

ठाकरेंच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न

आपण आदित्य ठाकरे असल्याचं भासवणार्‍या व्यक्तीने त्याला मेसेज करून आपल्याला मित्राला काही रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करायची आहे. मात्र नेट बॅंकिंग काम करत नसल्याने 25 हजार रूपये ट्रान्स्फर करण्याची विनंती केली. हा व्यवहार पेटीएम द्वारा करण्यासाठी सांगण्यात आले तसेच आणि दुसर्‍या दिवशी पैसे परत दिले जातील आश्वासन सुद्धा दिले.

दिपेशला हा प्रकार संशयास्पद वाटला आणि दिपेशने दादर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी कलम 417, 419, 511, 66 (C), 66 (D) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. पोलिस ज्या मोबाईल क्रमांकावरून मेसेज करण्यात आले त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT