fraud with mother of CJ sharad bobade in nagpur  
महाराष्ट्र बातम्या

बापरे! चक्क सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आईची फसवणूक, आरोपीला अटक

अतुल मेहेरे

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांची आई मुक्ता बोबडे यांची अडीच कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आली. सीताबर्डी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा यासंदर्भातील प्रकरण दाखल करून गुन्हेगाराला अटक केली. प्रकरण संवेदनशील असल्याने आतापर्यंत पोलिस माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते. पण आज दुपारी याप्रकरणातील एक आरोपी तापस घोष याला अटक करण्यात आल्याची माहिती झोन क्रमांक दोनच्या पोलिस उपायुक्त विनिता शाहू यांनी दिली. 

पोलिस उपायुक्त शाहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोबडे कुटुंबीयांची आकाशवाणी चौकात वडिलोपार्जित स्थावर संपती आहे. त्यावर सीझन लॉन तयार केलेले आहे. मागील सुमारे १० वर्षापूर्वी तापस घोष याला हे लॉन चालविण्यासाठी दिले होते. यापासून मिळणाऱ्या किरायाच्या पैशांचा हिशेब तापस घोष आणि त्याची पत्नी ठेवायचे. या लॉनची मालकी शरद बोबडे यांच्या आई मुक्ता बोबडे यांच्या नावे आहे. त्या बऱ्याच वयोवृद्ध आणि आजारी आहेत. घोष दाम्पत्याने मुक्ता बोबडे यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन लॉनच्या किरायापोटी वसूल करण्यात आलेल्या रकमेत हेराफेरी केली. त्यांनी बनावट पावत्या तयार करून रक्कम हडपली.

२०१६ पासून हा प्रकार सुरू होता. काही दिवसांपूर्वी ही फसवणूक बोबडे कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी घोष दाम्पत्याची चौकशी केली असता जवळपास अडीच कोटी रुपयांचा गैरप्रकार केल्याची बाब पुढे आली. या आधारावरून मंगळवारी रात्री उशिरा सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आज दुपारनंतर आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचेही विनिता शाहू यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT