महाराष्ट्र बातम्या

राज्यात आजपासून मोफत रक्त मिळणार! शासन निर्णय जाहीर

भाग्यश्री भुवड

मुंबई : राज्यात आजपासून सरकारी रुग्णालयातील रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध होणार आहे. याबाबतचा आरोग्य विभागाने शुक्रवारी शासन निर्णय जाहीर केला. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागात एकूण 34 रक्त पेढ्या कार्यरत आहेत आणि या रक्तपेढ्यांमार्फत प्रतिवर्षी सुमारे 1.5 लक्ष रक्त पिशव्या संकलित करुन गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात येतो. या संदर्भात शासनाने 27 एप्रिल 2015 च्या परिपत्रकानुसार रक्त पिशव्यांसाठी सेवा शुल्क दर निश्चित करण्यात आलेले आहेत. सद्या देशात उद्भवलेल्या कोविड 19 महामारीमुळे सर्व सामान्य जनतेची सोय तसेच सर्वसामान्य रुग्णांची गरज व सोय लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वैद्यकीय महाविद्यालय सलंग्न शासकीय रुग्णालयांमध्ये भरती असणाऱ्या रुग्णांना रक्तपेढीतील रक्त पिशव्या व रक्त घटक मोफत उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार निर्णय घेत मोफत रक्त मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

शासन निर्णय :-

वर्ष 2020-21 साठी सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वैद्यकीय महाविद्यालय सलग्न शासकीय रुग्णालयात भरती असणाऱ्या रुग्णांवर रक्तपेढीतील रक्त पिशव्या व रक्त घटक मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

------------------------------------------------------ 

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : अशोक खरातचा पाय आणखी खोलात ! फरार पत्नीची कोर्टात धक्कादायक कबुली, प्रकरणात नवा ट्विस्ट

Shocking : पाकिस्तानचा खेळाडू ड्रग्ज घेऊन T20 World Cup 2026 खेळला; ICC ने खरमरीत पत्र पाठवलं, भारताविरुद्धच्या सामन्यात...

स्टार प्रवाहवरील गाजलेल्या लोकप्रिय मालिकेचा झाला हिंदी रिमेक ! कुमकुम भाग्य फेम हिट जोडीची मुख्य भूमिका

Latest Marathi News Live Update: अनुसूचित जाती जमाती आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात धुळ्यात भीम आर्मी आक्रमक

IPL 2026 : हार्दिक पांड्यासोबत 'राडा'? भाऊ, कृणालने एकदाचं सर्व सांगूनच टाकलं; All OK? या प्रश्नावर म्हणाला...

SCROLL FOR NEXT