मोफत उपचार sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील सर्वांनाच आता 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! 1300 आजारांचा योजनेत समावेश, पण ‘हे’ कार्ड आजच काढा, कागदपत्रे कोणती लागणार, नक्की वाचा

अंत्योदय, पिवळे, केशरी रेशनकार्डधारकांसह आता शुभ्र रेशनकार्ड असलेल्या कुटुंबांना देखील पाच लाख रुपयांपर्यंत दरवर्षी मोफत उपचार मिळणार आहेत. आता महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे जिल्ह्यातील लाभार्थी ४० लाख १३ हजार २५२ एवढी झाली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : अंत्योदय, पिवळे, केशरी रेशनकार्डधारकांसह आता शुभ्र रेशनकार्ड असलेल्या कुटुंबांना देखील पाच लाख रुपयांपर्यंत दरवर्षी मोफत उपचार मिळणार आहेत. राज्य शासनाने त्यासंदर्भातील आदेश नुकताच काढला आहे. त्यानुसार आता महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे लाभार्थी एकूण ४० लाख १३ हजार २५२ एवढी झाली आहे.

राज्यातील जनतेला घरपोच आरोग्य सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देण्यासाठी आणि नागरिकांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी सरकारने ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू केली होती. गेल्या वर्षी जूनमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेतील विमा संरक्षित रक्कम दीड लाखांवरून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला.

आता योजनेतील राज्यातील रुग्णालयांची संख्या एक हजारावरून एकोणीसशे झाली असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील ९० रुग्णालये असतील. रुग्णांना लाभासाठी शिधापत्रिका (रेशन कार्ड) किंवा अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) आवश्यक असणार आहे. या कागदपत्रांची पुर्तता करणाऱ्यांनी विम्याचे संरक्षण मिळेल. योजनेत विविध कर्करोग, हृदयरोग, शस्त्रक्रिया, सांधेदुखी असे प्रमुख आजार देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. योजनेच्या लाभासाठी मात्र लाभार्थींकडे आयुष्यमान गोल्डनकार्ड असणे बंधनकारक आहे.

राज्यातील १९०० रुग्णालयात मिळतील मोफत उपचार

राज्यातील एक हजार ९०० रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेअंतर्गत रुग्णाला उपचार घेण्यासाठी संलग्नित रुग्णालयात जावे लागणार आहे. https://www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर योजनेतील रुग्णालयांची यादी उपलब्ध आहे. या वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला नेटवर्क हॉस्पिटलच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर जिल्हा निवडल्यानंतर रुग्णालयांची संपूर्ण यादी दिसेल.

जिल्ह्यातील योजनेतील लाभार्थी

  • ‘पीएमजेएवाय’चे लाभार्थी

  • ११,५९,३५८

  • अंत्योदय, केशरी, पिवळे कार्डधारक

  • ११,८८,१९७

  • शुभ्र रेशनकार्डधारक

  • १६,६५,६९७

  • एकूण लाभार्थी

  • ४०,१३,२५२

आयुष्यमान गोल्डनकार्ड काढण्यासाठी जिल्ह्यात लवकरच विशेष मोहीम

राज्य सरकारच्या नवीन निर्णयामुळे आता पांढरे रेशनकार्ड असलेल्यांनाही जनआरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी लाभार्थींनी ‘आयुष्यमान गोल्डन कार्ड’ काढून घ्यावे आणि योजनेचा लाभ घ्यावा. त्यासाठी काही दिवसांत जिल्हाभर विशेष मोहीम राबविण्याचे नियाजेन आहे. जवळपास १३०० आजारांवर या योजनेतून मोफत उपचार मिळणार आहेत.

- डॉ. माधव जोशी, जिल्हा समन्वयक, जनआरोग्य योजना, सोलापूर

गोल्डनकार्ड कसे काढता येईल?

लाभार्थींनी स्वत:च्या कुटुंबातील सर्वांचे आधारकार्ड, रेशनकार्ड, मोबाईल क्रमांक व स्वत: हजर राहून आपले सरकार सेवा केंद्रातून आयुष्यमान गोल्डनकार्ड काढता येणार आहे. त्यासाठी ५० ते ५५ रुपयांचाच खर्च आहे. आजारी पडल्यानंतर लाभार्थी ते कार्ड घेऊन योजनेतील रूग्णालयात गेल्यावर त्यांना त्याठिकाणी पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: ध्रुव जुरेलने शतकानंतर केलेल्या सेलिब्रेशन मागचं कारण काय? स्टोरी ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान Video Viral

Latest Marathi News Live Update: सुरत हायड्रोजन रेल्वे साइटवर केंद्रीय मंत्रींची पाहणी

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवा अन् ४० लाखांचा फंड मिळवा, 'ही' स्कीम माहिती आहे का?

लगाच्या १२ वर्षानंतर घेतला घटस्फोट; आता मुलाचा एकट्याने सांभाळ करतेय मराठी अभिनेत्री; , म्हणते- त्याला माझी गरज...

Crime: वृद्ध महिलेचं ३५ वर्षीय मजुरासोबत प्रेमाचं सूत जुळलं; एकत्र राहण्यासाठी भयंकर कृत्य केलं, जे घडलं त्यानं कुटुंब हादरलं

SCROLL FOR NEXT