Darshana Pawar Murder Case Esakal
महाराष्ट्र बातम्या

Darshana Pawar Murder Case: बंगाल ते अंधेरी.. सततचा ट्रेन प्रवास अन् असा पकडला दर्शनाचा मारेकरी.. पोलिसांनी सांगितला थरार

लग्नाला नकार मिळाल्याने राहुल हंडोरे याने दर्शना पवारची केली हत्या

अंकिता खाणे (Ankita Khane)

दर्शना पवार हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी राहुल हंडोरेला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मुंबई येथून काल हंडोरेला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरेला अटक केली आहे. लग्नाला नकार मिळाल्याने राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. चार दिवसांनी त्याला अटक करण्यात आली आहे.(Latest Marathi News)

या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, काल रात्री राहुल हांडोरे याला अटक केली आहे. आज आरोपी राहुलला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. त्यानंतर त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात येईल. त्यानंतर त्याची चौकशी सुरू होईल असं पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.(Latest Marathi News)

तर आरोपी राहुल हांडोरे यांची आणि दर्शनाची लहानपणापासूनची ओळख होती. लग्न करण्याच्या वादावरून त्याने दर्शनाची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राहुल पार्ट टाइम जॉब करत असतानाच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. तर हत्येची कबुली राहुल याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.(Latest Marathi News)

तर न्यायालयाने राहुलला कोठडी सुनावल्यानंतर सखोल चौकशी होईल. घटनेनंतर राहुल बंगालला गेला त्यानंतर तो मुंबईत पोहचला तो सातत्याने फिरत असल्यामुळे त्याला पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिस त्याचं लोकेशन वारंवार तपासत होते. बंगालवरून मुंबईत येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

लग्नाला नकार मिळाल्याने राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. चार दिवसांनी त्याला अटक करण्यात आली आहे.(Latest Marathi News)

तर खून करताना त्याला कोणीही पाहिलेले नाही, बाकी गोष्टी सखोल चौकशीमधून समोर येतील असं पुणे ग्रामीण पोलिस अंकित गोयाल यांनी म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

दर्शना पवार हत्या प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरेला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर दर्शनाच्या भावाने संतप्त मागणी केलीय. 'त्याने माझ्या बहिणीचा घात केला आहे. त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या. अन्यथा मारून टाका', अशी संतप्त प्रतिक्रिया दर्शना पवारच्या भावाने दिली आहे.(Latest Marathi News)

'माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे त्याचे करू द्या. मला माझ्या मुलीला न्याय द्यायचा आहे आणि तो मीच देवू शकते. माझी मुलगी गेलीय. तशा इतरांच्या मुली ‌जावू नये. आरोपीला आमच्या ताब्यात द्या नाहीतर फाशी द्या', अशी संतप्त प्रतिक्रिया दर्शनाच्या आईने दिली आहे.(Latest Marathi News)

राहुलची दर्शनाशी विवाह करण्याची इच्छा होती. एमपीसी उत्तीर्ण झाल्यानंतर घरच्यांनी दर्शनाचा दुसऱ्या एका मुलासोबत विवाह ठरवला होता. त्यानंतर 'मला वेळ द्या 'अशी विनंती राहुलने तिच्या घरच्यांना केली होती. पण घरच्यांनी नकार दिला होता.(Latest Marathi News)

दर्शना पवार तिचा मित्र राहुल हांडोरे याच्यासह १२ जून रोजी राजगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यासाठी गेली होती. दोघेही दुचाकीवरुन तिथं दाखल झाले होते. सकाळीच्या १० च्या सुमारास राहुल हांडोरे किल्ल्यावरुन एकटाच खाली येत असल्याचं एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं. तेव्हापासून राहुल हांडोरे गायब होता.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT