Uddhav Thackeray EKnath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: राज्याच्या सत्तासंघर्षाबाबत हालचाली सुरू; राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय

राज्यातील सत्तासंघर्षाबाबत मोठी माहिती समोर आली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यातील सत्तासंघर्षाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. अपात्र आमदारांबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असं सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालामध्ये म्हंटलं होतं. त्यानंतर आता घडामोडी वेगाने सुरू झाल्या आहेत. या प्रकरणात आता विधीमंडळाकडून थेट मुख्य निवडणूक आयुक्तांकडे धाव घेण्यात आली आहे.

पक्षाची घटना दोन्ही गटांकडून मागवण्याऐवजी थेट निवडणूक आयुक्तांकडून मागवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतचे वृत्त 'न्यूज 18 लोकमत'ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

विधीमंडळ आता पक्षाची घटना दोन्ही गटांकडून घेण्याऐवजी थेट निवडणूक आयुक्तांकडून मागवणार असल्याची माहिती आहे. निवडणूक आयुक्तांकडे जुलै 2022 मध्ये नोंदवण्यात आलेल्या पक्षाची घटना विधीमंडळ मागवणार आहे. त्यानुसार खरी शिवसेना कोणती याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुप्रीम कोर्टाने दिलेला शिवसेनेतील अपात्र आमदारांचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर सोपावली आहे. तर याआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली होती.

'आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही गटाकडून पक्षाची घटना मागवली जाईल, पक्ष घटनेनुसार चालतो की नाही हे तपासलं जाईल, त्यानंतर अपात्रतेबाबत निर्णय घेतला जाईल असं राहुल नार्वेकर यांनी म्हंटलं होतं. आता मात्र विधीमंडळ दोन्ही गटाकडून घटना न मागवता थेट निवडणूक आयोगाकडून पक्षाची घटना मागवण्याची शक्यता व्यक्त होतं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT