Sugar Factory
Sugar Factory Sakal
महाराष्ट्र

एकोणीस साखर कारखाने अडचणीत; मालमत्ता जप्तीच्या नोटीस

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शेतकऱ्यांनी (Farmer) काबाडकष्ट करून साखर कारखान्यांना (Sugar Factory) ऊस (Sugarcane) उपलब्ध करून दिला. परंतु यंदाचा गाळप हंगाम संपत आला तरी राज्यातील १९ साखर कारखान्यांनी त्यांची साडेचारशे कोटींची बिले (Bill) दिलेली नाहीत. उसाचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) (FRP) थकविणाऱ्या या साखर कारखान्यांविरुद्ध आरआरसीची (महसुली वसुली प्रमाणपत्र) कारवाई (Crime) करण्यात आली आहे. या कारखान्यांना साखर आयुक्तांनी मालमत्ता जप्तीच्या नोटीस (Notice) जारी केल्या आहेत. (FRP of Rs 452 Crore Arrears due to 19 Sugarmills State)

राज्यातील १९० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. त्यापैकी १०३ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची संपूर्ण रक्कम अदा केली आहे. ८१ कारखान्यांनी निम्म्याहून अधिक एफआरपी रक्कम दिली आहे. चार कारखान्यांनी निम्म्याहून कमी तर] सातारा जिल्ह्यातील किसनवीर कारखाना आणि लातूर जिल्ह्यातील पन्नगेश्वर शुगर या दोन कारखान्यांनी ऊस उत्पादकांना अद्याप दमडीही दिलेली नाही.

आरआरसी नोटीस जारी केलेले कारखाने :

किसनवीर खंडाळा सातारा, पन्नगेश्वर शुगर लातूर, तासगाव शुगर सांगली, किसनवीर भुईंज सातारा, भीमा टाकळी सोलापूर, वैद्यनाथ कारखाना-परळी बीड, यशवंत शुगर सांगली, श्री विठ्ठल सोलापूर, लोकमंगल ॲग्रो सोलापूर, लोकमंगल शुगर्स सोलापूर, लोकमंगल माऊली शुगर-लोहारा उस्मानाबाद, विठ्ठल रिफाइंड शुगर सोलापूर, सिद्धनाथ शुगर सोलापूर, जय भवानी-गेवराई बीड, संत दामाजी सोलापूर, गोकूळ सोलापूर, जयहिंद शुगर सोलापूर, गोकूळ माऊली सोलापूर, कांचेश्वर शुगर-मंगरूळ उस्मानाबाद.

१५ मे २०२१ अखेरपर्यंतची स्थिती :

  • शेतकऱ्यांना देय एफआरपी रक्कम : २२ हजार ८८८ कोटी

  • शेतकऱ्यांना दिलेली एफआरपी : २१ हजार ४५४ कोटी (९३.६३ टक्के)

  • प्रलंबित एफआरपी रक्कम : १ हजार ४५८ कोटी (६.३७ टक्के)

शेतकऱ्यांची एफआरपी न देणाऱ्या राज्यातील १९ कारखान्यांविरुद्ध आरआरसी नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित कारखान्यांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

- शेखर गायकवाड, साखर आयुक्त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT