petrol and diesel price hike sakal
महाराष्ट्र बातम्या

तेरा दिवसांमध्ये ११ वेळा इंधन दरवाढ

पेट्रोल, डिझेलच्या दरात रविवारी ८४ पैसे दरवाढ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने देशात इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. २२ मार्चपासून सुरू झालेली दरवाढ अद्याप कायम आहे. १३ दिवसांत साधारण ११ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. रविवारी मुंबईत पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा सरासरी ८४ पैशांनी वाढ झाल्याने पेट्रोल ११८.४१; तर डिझेल १०२.६४ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले.

युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे एकूणच जगभरातील बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. देशात जीवनावश्यक वस्तूसुद्धा महागल्या आहेत. इंधनाच्या दराने तर सर्वसामान्यांनाचे कंबरडे मोडले आहे. कधी नव्हे एवढ्या किमतीमध्ये पेट्रोल, डिझेल सर्वसामान्य नागरिकांना विकत घ्यावे लागत असल्याने महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. विशेषतः यामध्ये अल्प आणि मध्यम रोजगार करणाऱ्यांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे; तर डिझेल दरवाढीमुळे वाहतूकदारसुद्धा अडचणीत सापडले आहेत. गेल्या ११ दिवसांमध्ये पेट्रोलमध्ये तब्बल ८.४३; तर डिझेल दरांमध्ये ८.४९ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात अजूनही इंधन दरवाढ सुरू राहिल्यास भविष्यात इंधन दरांमध्ये रेकॉर्ड ब्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; तर त्याच प्रमाणात सर्वसामान्यांचा प्रवाससुद्धा महागडा होणार आहे.

२१ मार्च-

  • पेट्रोल- १०९.९८ रु.

  • डिझेल- ९४.१४ रु.

३ एप्रिल-

  • पेट्रोल- ११८.४१ रु.

  • डिझेल- १०२.६४ रु. (दर मुंबईप्रमाणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT