chhatrapati sambhaji nagar news esakal
महाराष्ट्र बातम्या

Video : सरपंचाने पंचायत समिती आवारात पाडला पैशांचा पाऊस; विहीरींसाठी केली होती लाचेची मागणी

संतोष कानडे

छत्रपती संभाजी नगरः छत्रपती संभाजी नगरच्या फुलंब्री तालुक्यातील एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये एक सरपंच गळ्यात नोटांची माळ घालून येतो आणि पंचायत समितीच्या आवारात पैशांची उधळण करतो.

फुलंब्री पंचायत समितीच्या आवारातील हा व्हीडिओ आहे. या व्हीडिओमध्ये तरुण सरपंचाने स्वतः सगळी माहिती दिलीय. मंगेश साबळे हे फुलंब्री तालुक्यातल्या गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत. पंचायत समितीमध्ये गावातील विहीरी मंजुरीसाठी पैसे मागितीतले जात असल्याने त्यांनी दोन लाख रुपये पंचायत समितीच्या आवारामध्ये उधळले.

सरपंच मंगेश साबळे हे व्हीडिओमध्ये सांगतात की, मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी हे शेतकऱ्यांचं सरकार असल्याचं सांगत आहेत. परंतु फुलंब्री पंचायत समितीच्या बीडीओ मॅडम लाचेची मागणी करतात. गोरगरीब शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कुणीही नाहीये, असा आरोप त्यांनी केलाय.

साबळे व्हीडिओमध्ये पुढे म्हणतात, एका विहीरीच्या मंजुरीसाठी बीडीओ मॅडम १५ हजार रुपये मागतात, इस्टिमेटसाठी इंजिनिअरकडून पंधरा हजार मागितले जातात, ग्रामरोजगार सेवक पंधरा हजार मागतो. एवढे पैसे शेतकरी आणणार कुठून? विहीरीसाठी शासन चार लाख रुपये अनुदान देतं खरं, परंतु हे लोक लाख-दीड लाख रुपये पगारी घेऊनही लाच मागतात.

मी गोरगरीब शेतकऱ्यांची कामं करतो. आज मी २० विहिरींच्या मंजुरीसाठी दोन लाख रुपये देतो पण कामं करा, असा आक्रोश करत सरपंच मंगेश साबळे यांनी पंचायत समितीच्या आवारात अक्षरशः पैशांचा पाऊस पाडला.

आपण पत्येक शेतकऱ्याकडून दहा हजार रुपये मंजुरीसाठी आणले आहेत. हे पैसे घेऊन त्यांनी विहिरी मंजूर कराव्यात. जर मंजुऱ्या दिल्या नाहीत तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांना नागडं बसवणार असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकांसमर भीक मागण्याचा इशारा व्हीडिओमधून देण्यात आलेला आहे.

सदर व्हीडिओ व्हायरल होत असून याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. व्हीडिओच्या सत्यतेबाबतची पुष्टी आम्ही करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Market Alert : IPO मध्ये गुंतवणूक करायची आहे? या आठवड्यात शेअर बाजारात खुले होणार 6 नवे IPO; जाणून घ्या कधी आणि कोणते?

Parli Nagar Parishad Election: परळी नगर पालिकेत राष्ट्रवादीच्या आघाडीतून MIM बाहेर; सत्तास्थापनेनंतर नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

Pune News : गणेश बिडकरांनी ओलांडला वीस लाख पावलांचा टप्पा; ६० हजार नागरिकांशी सहा महिन्यांत तीनदा थेट संपर्क

Apple Nutrition: लाल की हिरवे सफरचंद? जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते फायदेशीर

SCROLL FOR NEXT