Viral song Sakal
महाराष्ट्र बातम्या

"फुटला गं बाई फुटला, माझ्या बाबांचा पक्ष फुटला" राष्ट्रवादीतील फुटीनंतर 'हे' गाणं Viral

हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

दत्ता लवांडे

राष्ट्रवादीमध्ये सध्या अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले असून अजित पवार गटाने मूळ पक्षावर दावा सांगितला आहे. त्याचबरोबर अजित पवार गट सत्ताधाऱ्यांसोबत गेल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट निर्माण झाली आहे. या सगळ्या परिस्थितीनंतर ट्वीटरवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोनजण "फुटला गं बाई फुटला माझ्या बाबांचा पक्ष फुटला" हे गाणं गाताना दिसत आहेत. तर त्यांनी दिसला गं बाई दिसला या गाण्याचे रिमेक बनवले आहे. हा व्हिडिओ @marathikedar या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून सर्वेश देशपांडे आणि मुरारी देशपांडे यांनी हे गाणं गायलं आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.

गाण्याचे बोल

तुरीच देऊन बाबांच्या हाती

मिळवली दादाने मजबूत खाती

आव्हाडांकडे प्रतोदपद

जरासं सावरण्यासाठी

रक्ताचा दादा वागायला साधा

कसा दिसेना मला ग बाई बाई कसा दिसेना मला

इथे दिसेना तिथे दिसेना शोधू कुठं कुठं

दिसला गं बाई दिसला दिसला ग बाई दिसला

शपथ घेताना चिडवत हसला ग बाई हसला

फुटला गं बाई फुटला, माझ्या बाबांचा पक्ष फुटला गं बाई फुटला

माझ्या बाबांचा खानदानी पक्ष

परिवाराच्या हितास दक्ष

जिल्ह्यात होता इन मीन साडेतीन

तोही आता पुसला

पुसला कुणी पुसला कुणी पुसला कुणी अगं देवा

फुटला गं बाई फुटला, माझ्या बाबांचा पक्ष फुटला गं बाई फुटला

आमच्या पक्षात होते मुंगळे

गूळ खायाला धावले सगळे

वळसे, भुजबळ, मुश्रीफ तटकरे

पटेल पण तसला

गं बाई बाई पटेल पण तसला

मोजू किती मोजू किती मोजू किती

फुटला गं बाई फुटला, माझ्या बाबांचा पक्ष फुटला गं बाई फुटला

आता पक्षात उरले दोन

माझे बाबा,मी आणखी कोण

घरातला खंजीर बाबांच्या पाठीत

कचकन ग घुसला

काढू कसा काढू कसा काढू कसा

दिसला गं बाई दिसला माझ्या बाबांना भूतकाळ दिसला गं बाई दिसला

फुटला गं बाई फुटला

माझ्या बाबांचा पक्ष फुटला गं बाई फुटला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नांदणी तपासणी नाक्यावर लाच घेणारा आरटीओ निरीक्षक व खासगी व्यक्ती रंगेहाथ सापडला, ड्रॉव्हरमध्ये किती रुपये, वाचा...

Islapur News : बँकेच्या कर्जाला कंटाळुन एका शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Vehicle Fitness Test: आरटीओची मोठी डिजिटल झेप! ६ मिनिटांत वाहनांची फिटनेस तपासणी करणार, नवीन प्रणाली कधी लागू करणार?

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

SCROLL FOR NEXT