SET Admit Card sakal
महाराष्ट्र बातम्या

भावी प्राध्यापकांची रविवारी ‘सेट’! राज्यातील १,२८,२४३ विद्यार्थी देणार २९८ केंद्रांवर परीक्षा; २ तास अगोदर केंद्रांवर उपस्थिती आवश्यक

राज्यस्तरीय ‘सेट’साठी राज्यभरातील एक लाख २८ हजार २४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातील १७ शहरांमधील २९८ केंद्रांवर ही परीक्षा रविवारी होणार आहे. सोलापूर शहरातील सहा हजार ८८८ विद्यार्थी देखील ही परीक्षा देणार आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : प्राध्यापक पदासाठी आवश्यक पात्रता परीक्षा सेट येत्या रविवारी (ता. ७) होणार आहे. त्यासाठी सोलापूर शहरात १५ केंद्रे असून या परीक्षेसाठी जिल्ह्यातील सहा हजार ८८८ विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याची माहिती सोलापूर सेट परीक्षेचे संपर्क प्रतिनिधी डॉ. विकास घुटे यांनी दिली.

राज्यस्तरीय ‘सेट’साठी राज्यभरातील एक लाख २८ हजार २४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातील १७ शहरांमधील २९८ केंद्रांवर ही परीक्षा रविवारी होणार आहे. सोलापूर शहरातील सहा हजार ८८८ विद्यार्थी देखील ही परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा दोन सत्रात होणार असून पहिल्या सत्रात सकाळी १० ते ११ या वेळेत पेपर-एक व दुसऱ्या सत्रात सकाळी साडेअकरा ते दुपारी दीड या वेळेत दुसरा पेपर होणार आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी दोन तास अगोदर केंद्रांवर उपस्थित राहावे लागणार आहे. परीक्षेसाठी प्रवेशपत्र आवश्यक असून विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र सोबत घेवून परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. घुटे यांनी केले आहे. प्राध्यापक भरतीसाठी विद्यार्थ्यांना ‘सेट’चे दोन्ही पेपर देणे बंधनकारक आहे.

सोलापुरात परीक्षेसाठी ‘ही’ १५ केंद्रे

सोलापूर शहर- जिल्ह्यातील १५ केंद्रांवर विद्यार्थ्यांची सेट परीक्षा होणार आहे. त्यात संगमेश्वर महाविद्यालय, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय, हिराचंद नेमचंद कॉमर्स महाविद्यालय, कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय, डी. बी. एफ. दयानंद महाविद्यालय, श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक महाविद्यालय, श्री सिद्धेश्वर वुमेन्स इंजिनिअरिंग महाविद्यालय, सोलापूर सोशल असोसिएशन कला व वाणिज्य महाविद्यालय, एल. बी. पी. महिला महाविद्यालय, एस. बी. नवले सिंहगड इंजिनिअरिंग महाविद्यालय, भारती विद्यापीठ अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, फार्मसी कॉलेज व संगणकशास्त्र संकुल सोलापूर विद्यापीठ या परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT