Narayan Rane  esakal
महाराष्ट्र बातम्या

Narayan Rane: मोदी जे बोलतात ते करून दाखवतात, राणेंची संक्रांत स्पेशल गोड बोलत फटकेबाजी

नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.

सकाळ डिजिटल टीम

जी 20 परिषदेला आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे. यावेळी नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केले. मोदी जे बोलतात ते करून दाखवतात, संक्रांत स्पेशल गोड बोलत राणेंनी यावेळी चांगलीच फटकेबाजी केली. (G-20 summit begins today in Pune Narayan Rane PM Narendra Modi )

उद्घाटनादरम्यान, नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण देशाची प्रगती करतो आहोत. अमेरिका, चायना, जपान, जर्मनी यानंतर भारत 5 वे येण्याचा प्रयत्नात आहे. मला अभिमान आहे नरेंद्र मोदी जे बोलतात ते पुर्ण करतात. अशा शब्दात राणेंनी कौतुक केले.

Sharmila Thackeray: उर्फी जावेद प्रकरणावर शर्मिला ठाकरेंची दोन वाक्यांत प्रतिक्रिया

तसेच, संक्रांतीवर बोलताना राणे म्हणाले मी नेहमीच गोड बोलतो. शहरांचे स्वरूप कसे असावे याचे मार्गदर्शन या परिषद मधून मिळेल आणि याला केंद्र सरकार, राज्य सरकार निधी उपलब्ध करेल. महाराष्ट्र प्रशासन बद्दल मला अभिमान आहे.

G-20 परिषदेला आजपासून सुरुवात, नारायण राणेंनी केले उद्घाटन

आपण आपल्या नेत्यांची किंवा कुठल्या ही पक्षाची बौद्धिक पातळी कमी लेखू शकत नाही. सरकार बदलले निर्णय बदलतात या गोष्टीला मी सहमत नाही. मी ३२ वर्ष मंत्री होतो कुठल्या न क्कुठल्या खात्याचा. निर्णय बदलत नाहीत दृष्टिकोन बदलतो. असही नारायण राणे यावेळी म्हणाले.

उद्योग बाहेर जात नाहीत. हे राजकारण आहे वास्तव नाही

उद्योग बाहेर जातात या चुकीच्या बातम्या नाहीत पण मिस गाईड करणाऱ्या बातम्या आहेत. जे राज्य कर सवलत देईल त्यानंतर बाहेरच्या कंपनी तिथे येऊन गुंतवणूक करतात. देशाच्या इतर भागा पेक्षा जागेचे दर महाराष्ट्रात महाग आहेत.

उद्योग जातात बाहेर पण परत महाराष्ट्रात परत येतात. माझ्या जवळ सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रिपद आहे. उद्योग महाराष्ट्रात येण्याकरीता केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. रोजगार देण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. २०० कोटीचा ट्रेनिंग प्रोग्राम पुण्यात येईल. अशी माहिती राणेंनी दिली.

जी २० पोस्टर वर कमळ आहे. कमळ हे भाजप च नाही भारताचे आहे. भाजप म्हणून जरी घेतले तरी माझी हरकत नाही. जो भाजप मध्ये येईल त्याचा शाश्वत विकास होईलच. असही राणे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT