Nitin-Gadkari  
महाराष्ट्र बातम्या

गडकरी म्हणतात, पेट्रोल, डिझेलऐवजी इथेनॉल, बायोसीएनजी वापरावर भर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करण्यासाठी उद्योगांनी या भागात जावे. या क्षेत्राच्या विकासास मी अधिक प्राधान्य देतो. कारण आता शहरांमध्ये उद्योगांसाठी जागा उपलब्ध नसून, असंख्य समस्यांचा उद्योगांना सामना करावा लागतो आहे. नवीन उद्योगांनी कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्राची निवड केली पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. 

"जॉब ग्रोथ ऍण्ड सस्टेनेबिलिटी' पुस्तक प्रकाशनच्या प्रसंगी ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलत होते. अधिक रोजगार कसे निर्माण होतील यासाठी आमचा प्रयत्न आहे. कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्राच्या विकासामुळे आमची अर्थव्यवस्था अधिक सुधारणार आहे. तसेच उद्योगांना लागणारा कच्चा माल ग्रामीण भागात उपलब्ध असल्यामुळे उत्पादन खर्च कमी होईल. आता आयात कमी आणि निर्यात अधिक असे सूत्र स्वीकारावे लागेल असे नितीन गडकरी म्हणाले. 

वर्धा येथे खादी ग्रामोद्योगामार्फत आम्ही 10 लाख महिलांना सोलर चरखा दिला. 1 लाख रुपये कर्ज देऊन हा चरखा आम्ही त्यांना दिल्याने रोजगार निर्माण झाला. त्या चरख्यातून निघणारे सूतही आम्ही घेत आहोत. अशा लहान लहान उद्योगाच्या माध्यमातून उत्पादन वाढून निर्यातयोग्य स्थिती निर्माण होईल व अर्थव्यवस्था मजबूत होईल. पेट्रोल डिझेलऐवजी आता इथेनॉल, बायो सीएनजी याचा वापर वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. अनेक ठिकाणी आम्ही यात यशस्वीही झालो आहोत. नागपुरात 250 कार आणि 100 बसेस आम्ही बायो सीएनजीवर चालवीत आहोत. 400 बसेस बायो इथेनॉलवर चालविण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच ऊर्जानिर्मिती केंद्राला 325 कोटी रुपयांमध्ये सांडपाणी आम्ही विकले आहे. भारतात दिवसाला 15 हजार कीट तयार होत असून, या कीटला आता निर्यातीची परवानगीही मिळाली आहे. आता सॅनिटायझरही तयार करून तेही निर्यात करू शकतो, असा विश्‍वास देखील नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केला.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: जवखेडा ठोंबरे येथे शेतकरी संवाद सभा

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT