Gajanan maharaj palkhi in pandharpur sakal
महाराष्ट्र बातम्या

Ashadi Wari: गजानन महाराजांची पालखी पोहोचली पंढरपुरात, तब्बल 'इतक्या' दिवसांचा केला प्रवास

Asshadi Ekadashi : १५ जुलै सोमवार रोजी श्रींचा हा भव्य पालखी सोहळा मंगळवेढावरून संध्याकाळी पंढरपूरात दाखल झाला

सकाळ वृत्तसेवा

राजेश चौधरी

Gajanan Maharaj : विदर्भ पंढरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी सातशे वारकऱ्यांसह टाळ मृदंगाच्या गजरात गण गण गणात बोते, जय हरी विठ्ठल... श्री हरी विठ्ठल असा नामघोष करीत मोठ्या लवाजम्यासह राजवैभवी थाटात एका महिन्याचा पायी प्रवास करून सोमवार (ता.१५) सायंकाळी पंढरपूरात दाखल झाली.

सालाबादप्रमाणे यंदाही श्रीं ची पालखी १३ जून रोजी आषाढी वारीसाठी संतनगरीतून पंढरपूरकरिता मार्गस्थ झाली होती. १४ जुलै रोजी सकाळीच श्रींची पालखी ब्रम्हपुरीला पोहचली होती. रात्री श्रीक्षेत्र मंगळवेढा येथे मुक्काम होता. १५ जुलै सोमवार रोजी श्रींचा हा भव्य पालखी सोहळा मंगळवेढावरून संध्याकाळी पंढरपूरात दाखल झाला.

दरम्यान श्रीं च्या पालखीचे श्री संस्थानच्या शाखेत आगमण होताच प्रवेशव्दारावर भव्य स्वागत करण्यात आले. टाळ मृदंगासह विठू नामासह गण गण गणात बोतेचा गजर करीत पालखी शाखेत विसावली.

प्रवासा दरम्यान वारकऱ्यांनी ३३ दिवसांची पायदळ वारी केली. मागील ५५ वर्षांपासून श्रींच्या पालखी वारीची परंपरा कायम आहे. पालखी सोबत ७०० वारकरी मंडळीसह १ अश्व व ९ वाहने आहेत. वारकऱ्यांकरिता अॅम्बुलन्स गाडी, डॉक्टर व वाटचालीमध्ये असणाऱ्या इतर दिंडीतील वारकऱ्यांकरिता औषधोपचार केल्या जातो. वारकऱ्यांकरिता पाणी पिण्याकरिता टँकरची व्यवस्था आहे. पंढरपूर येथे १७ जुलै रोजी आषाढी सोहळ्यात सहभागी होवून विठुरायाचे दर्शन घेवून पाच दिवसांच्या मुक्कामानंतर २१ जुलै पासून श्रींच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे. २२ दिवसांचा परतीचा प्रवास करीत श्रींच्या पालखीचे ११ ऑगस्ट रोजी सकाळी खामगाव मार्गे संतनगरीत आगमन होणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT