CP M. rajkumar esakal
महाराष्ट्र बातम्या

गणेशोत्सवाचा परवाना पोलिस ठाण्यात मिळणार! सोलापूर पोलिस आयुक्तांचा ‘एक खिडकी’चा निर्णय; मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची मिटली चिंता, पोलिसांची आता सकाळ-संध्याकाळी गस्त

गणेशोत्सवाला आता ७ सप्टेंबरपासून सुरवात होत असून गणेशोत्सव मंडळांना उत्सवाचा परवाना ऑनलाइन मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात एक खिडकी योजना राबविणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली.

तात्या लांडगे

सोलापूर : गणेशोत्सवाला आता ७ सप्टेंबरपासून सुरवात होत असून गणेशोत्सव मंडळांना उत्सवाचा परवाना ऑनलाइन मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात एक खिडकी योजना राबविणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली. मंगळवारच्या (ता. २७) अंकात ‘सकाळ’ने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यातील गणेशोत्सव मंडळांना एक खिडकी योजनेतून ऑनलाइन परवाना दिला जाणार आहे. मात्र, मंडळाच्या अध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना शहरातील त्या त्या पोलिस ठाण्यात जावे लागणार आहे. मंडळाचे पदाधिकारी नेमके कोण, याची माहिती संबंधित पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना व्हावी हा त्यामागचा हेतू आहे.

शहर पोलिस आयुक्तालयात २९ ऑगस्ट रोजी शांतता कमिटीची बैठक होणार आहे. पारंपरिक वाद्याला पसंती देऊन मंडळांनी डीजेमुक्त मिरवणुका काढाव्यात, यासाठी पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी सर्वांना आवाहन केले आहे. मंडळांनी सार्वजनिक रस्त्याला अडथळा होणार नाही असा मंडप टाकावा, लाईट कनेक्शन अधिकृत असावे, अग्निशामक विभागाच्या सूचनांचे पालन करावे, गणपतीमुर्तीसमोर स्वयंसेवक नेमाव, सामाजिक उपक्रम राबवावेत, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.

शहरात आता दिवस-रात्र पोलिसांची गस्त

शहरातील हजारो नागरिक सकाळी साडेपाच ते सहापासून मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आता दररोज सकाळी सहा ते आठ या वेळेत प्रत्येक परिसरात (मॉर्निंग वॉकची ठिकाणे) एक साध्या वेशातील व एक गणवेशातील पोलिस पेट्रोलिंग (गस्त) करेल. याशिवाय रात्री दहा ते पहाटेपर्यंत देखील ‘क्युआर कोड’च्या जवळपास २०० ठिकाणी पोलिस पेट्रोलिंग करतील. त्यावेळी ज्याठिकाणी काही आक्षेपार्ह दिसेल त्याची चौकशी देखील करावी लागेल. काही ठिकाणी विनाकारण रात्री उशिरापर्यंत तरुण किंवा अन्य लोक थांबलेले असल्यास त्यांची माहिती घेतली जाईल, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हा रुग्णालयात लवकरच पोलिस चौकी

गुरुनानक चौकात नव्याने २०० खाटांचे (प्रत्येकी १०० खाटांचे महिला-शिशु व सर्वोपचार रुग्णालय) जिल्हा रुग्णालय सुरू झाले आहे. त्याठिकाणी सध्या ‘एमएलसी’ दाखल करायला पोलिस चौकीची सोय नाही. त्यामुळे रुग्णांना तथा त्यांच्या नातेवाईकांना सिव्हिल पोलिस चौकी, सदर बझार किंवा एमआयडीसी पोलिस ठाण्यात हेलपाटे मारावे लागत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. या पार्श्वभूमीवर तेथील रुग्णांच्या सोयीसाठी जिल्हा रुग्णालयात एक पोलिस कर्मचारी कायमचा नियुक्त केला जाईल, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ‘आरजेडीने’ विकासकामे बंद पाडली; पंतप्रधान मोदी, इंडिया आघाडी अनैसर्गिक

Latest Marathi News Live Update : इस्लामपूरचं नाव बदललं! आजपासून ईश्वरपूर

Kartik Purnima 2025: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा 'या' वस्तूचे दान आणि ग्रहदोषातून मुक्ती मिळवा!

भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी बॉलिवूड अभिनेत्रीने तिची संपूर्ण ब्रँड एंडोर्समेंट रक्कम दान केली होती, तुम्हाला माहित्येय का कोण आहे ती?

Shivendraraje Bhosale: आगामी निवडणूकीत कसे लढायचे, याचा निर्णय योग्‍यवेळी: मंत्री शिवेंद्रराजे भाेसले; साताऱ्यातील मेळाव्यात नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT