ganpati sakal
महाराष्ट्र बातम्या

Ganeshotsav : गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त आणि इतर खास गोष्टी; जाणून घ्या

यंदा श्रीगणेश चतुर्थीला म्हणजे मंगळवारी (ता. १९) पार्थिव गणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - यंदा श्रीगणेश चतुर्थीला म्हणजे मंगळवारी (ता. १९) पार्थिव गणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही. भद्रा व वैधृति योग असला तरीही ब्राह्म मुहूर्तापासून अर्थात पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ५० मिनिटांपर्यंत आपल्या घरात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करता येईल, असे दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी प्रात:कालापासून माध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळी श्रीगणेशाची स्थापना व पूजा करता येते. त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, विष्टिकरण आदी वर्ज्य नाहीत. श्रीगणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस किंवा त्याच दिवशी सकाळी मूर्ती आणावयास पाहिजे, असा नियम नाही, असे दाते यांनी स्पष्ट केले.

गणेशाची स्थापना उद्याच करा

महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आदी सर्व प्रदेशांत सर्वत्र मंगळवारीच श्रीगणेश चतुर्थी आहे. सोमवारी (ता. १८) तृतीया समाप्ती दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी असून, दुसऱ्या दिवशी चतुर्थी समाप्ती दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी आहे.

शास्त्रीय वचनाप्रमाणे मंगळवारी चतुर्थी संपूर्ण माध्यान्हव्यापिनी असल्याने आणि मंगळवार असल्याने या दिवशी पंचांगात दिलेली श्रीगणेश चतुर्थी योग्यच आहे, असे मोहन दाते यांनी सांगितले.

महत्त्वाचे दिवस...

  • १९ सप्टेंबर (मंगळवार) - श्रीगणेश चतुर्थी

  • २० सप्टेंबर (बुधवार) - ऋषिपंचमी

  • २१ सप्टेंबर (गुरुवार) - गौरी आवाहन (सूर्योदयापासून दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्रावर परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे.)

  • २२ सप्टेंबर (शुक्रवार) - गौरी पूजन

  • २३ सप्टेंबर (शनिवार) - गौरी विसर्जन (सूर्योदयापासून दुपारी २ वाजून ५६ मिनिटांपर्यंत मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करावे.)

  • २८ सप्टेंबर (गुरुवार) - अनंत चतुर्दशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Crime : गुजरातवरून येऊन नाशिकमध्ये सोनसाखळी चोरी, १८ गुन्ह्यांची उकल

Maharashtra Politics : साखर कारखान्यांना राज्य सरकारकडून कर्जाची हमी, शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफीचे गाजर; सरकारच्या भूमिकेने संभ्रम

जगातील पाच महान फलंदाजांमध्ये ना विराट कोहली, ना रोहित शर्मा; इंग्लंडच्या जो रूटचे मात्र नाव, कोणी केलीय निवड?

Election Commission : प्रतिज्ञापत्र द्या, अन्यथा माफी मागा; आरोपावरून निवडणूक आयोगाचे राहुल गांधी यांना आव्हान

Train Accident : एक्सप्रेस ट्रेनच्या धडकेत ४०० मेंढ्याचा मृत्यू, रुळावरुन वाहिला रक्ताचा पाट, कोल्ह्यांचा कळपावर हल्ला अन्...

SCROLL FOR NEXT